सर्वात आधी लागणार राजू शेट्टींचा ‘निकाल’ ?

लोकसभा निवडणुकीचे निकाल अवघ्या काही तासांवर आले आहेत पण इतर उमेदवारांप्रमाणे राजू शेट्टी यांना २३ तारखेला थोडी कमी प्रतीक्षा पाहावी लागणार आहे, कारण संपूर्ण महाराष्ट्रराज्यात सर्वात कमी म्हणजे १७ निकाल फेऱ्या या हातकणंगले मतदार संघात आहेत त्यामुळे सर्वात आधी त्यांचा निकाल लागू शकतो तर पालघर आणि भिवंडी – गोंदिया आणि ठाणे मतदारसंघात एकूण 33 निवडणूक निकाल फेऱ्या तर बीड आणि शिरुर मतदारसंघात एकूण 32 निवडणूक निकाल फेऱ्या होतील अशी माहिती निवडणूक आयोगाकडून मिळाली आहे.