बंदुकीची गोळी लागल्यास माणूस का मरतो? जाणून घ्या!

22

बंदुकीची गोळी लागल्यास माणूस का मरतो? हा प्रश्न तसा सोपा आहे. डोक्याला वा छातीवर गोळी मारल्यास मेंदूला इजा होऊन वा हृदयाला इजा होऊन व्यक्ती मरू शकते. शरीरातील महत्त्वाच्या इंद्रियांना गोळी लागल्यास माणूस मरेल, हे स्वाभाविक आहे; पण हातात, पायात, खांद्यात वा इतरत्र बंदुकीतील गोळी लागल्यास रक्तस्त्राव वगळता इतर कारणांनी माणूस मरतो का, ते पाहू.

बंदुकीच्या गोळीमध्ये दोन प्रकारची रसायने वापरली जातात. गावठी बंदुकीच्या गोळीत वापरल्या जाणाऱ्याा रसायानात कोळसा, सल्फर, पोटॅशियम नायट्रेट हे पदार्थ असतात. पेटल्यानंतर स्फोट होऊन या पावडरचे रूपांतर वायुत होते. यामुळे शरीरातील स्नायू जळतात वा भाजले जातात.

अत्याधुनिक बंदुकीमध्ये वापरल्या जाणाऱ्या पावडरीत नायट्रोसेल्यूलोज व कधी नायट्रोग्लिसरीनही असते. या 1 ग्रॅम पावडरमुळे स्फोट होऊन 900 मि.ली. वायू तयार होतो व शरीराचा बराच भाग जळतो. ही पावडर धातूच्या काडतुसात भरलेली असते. गोळीचा वेग, त्यातील विषारी पावडर पेटून निर्माण होणारा वायू व शरीर पोळण्याची क्षमता, तसेच महत्त्वाच्या अवयवांना होणारी इजा इत्यादीमुळे व्यक्तीचा मृत्यू होतो.

कधी कधी हृदयविकाराच्या झटक्याने, रक्तपुरवठा खंडित झाल्याने, कधी पोटातील आवरणात जंतूसंसर्ग झाल्याने (पोटाला गोळी लागल्यास), तर कधी न्यूमोनिया होऊन (डोक्याला गोळी लागून व्यक्ती खूप काळ बेशुद्ध राहिल्यास) व्यक्ती मरण पावते.

Get real time updates directly on you device, subscribe now.