शिक्षण तज्ञ प्रतापराव बोराडे यांच्या निधनाने आपण शिक्षण क्षेत्रातील एक व्यासंगी व्यक्तिमत्त्व गमावले, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

औरंगाबाद: महात्मा गांधी मिशनचे विश्वस्त तथा ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य प्रतापराव बोराडे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांनी काल अखेरचा श्वास घेतला.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत शोक व्यक्त केला आहे. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, महात्मा गांधी मिशन ट्रस्टचे विश्वस्त प्रतापराव शंकरराव बोराडे यांच्या निधनाचे वृत्त समजून दुःख झाले. महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्र प्रगतीपथावर आणण्यासाठी ते आजीवन प्रयत्नशील राहिले. त्यांच्या मार्गदर्शनात घडलेले असंख्य विद्यार्थी आज जगभरात आपला ठसा उमटवत आहेत. त्यांच्या निधनाने आपण शिक्षण क्षेत्रातील एक व्यासंगी व्यक्तिमत्त्व गमावले असल्याचे पाटील म्हणाले. मी प्राचार्य प्रतापराव बोराडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो व मृतात्म्यास सद्गती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
अशा भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या.