कोल्हापूर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांचे ना.चंद्रकांतदादांकडून स्वागत

कोल्हापूर,दि.:- कोल्हापूर जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, सांसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्वागत केले व त्यांच्या कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.
ना.चंद्रकातदादा यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या विविध विकास प्रकल्पांसंदर्भात चर्चा करुन सूचना दिल्या.मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात सहसचिव या पदावर कार्यरत होते.
पाटील यांनी राहुरी कृषि विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे.१९९५ साली ते प्रशासकीय सेवेत उपजिल्हाधिकारी या पदावर रुजू झाले.आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी य उपविभागीय अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, विशेष भूसंपादन अधिकारी, निवडणूक अधिकारी, रोजगार हमी अधिकारी आदी पदांवर विदर्भात काम केले. नांदेड येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी व एम.आय.डी.सी.चे विभागीय अधिकारी म्हणून काम केले.
कोरोना संकट काळात त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांनी केलेले काम विशेष उल्लेखनीय ठरले.पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांनी उपायुक्त म्हणून काम केले.उपमुख्यमंत्री कार्यालयात सहसचिवपदी कार्यरत असतानाच त्यांची कोल्हापूर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारीपदावर नियुक्ती झाली. संतोष पाटील यांना२०२२मध्ये आय.ए.एस.चा दर्जा त्यांना मिळाला आहे.