उच्च व तंत्र शिक्षण विभाग अंतर्गत वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या विविध प्रश्नासंदर्भात शासन सकारात्मक – चंद्रकांत पाटील

मुंबई : विधान परिषद व विधानसभेच्या सदस्यांकडून उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या विविध प्रश्नासंदर्भात निवेदनाच्या अनुषंगाने आयोजित बैठक आज मंत्रालयात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली . पाटील यांनी बैठकीमध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभाग अंतर्गत वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या विविध प्रश्नासंदर्भात शासन सकारात्मक असून याबाबतच्या प्रलंबित प्रश्नाबाबत वित्त विभागाशी चर्चा करून संबंधित प्रश्न सोडवले जातील असे आश्वासन दिले.
यावेळी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार कपिल पाटील, आमदार विक्रम काळे, आमदार जयंत आसगावकर,आमदार मनीषा कायंदे,उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.