नवमतदार नोंदणी अभियानाचा लाभ घेऊन लोकशाही बळकट करण्यासाठी योगदान द्यावे; चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोल्हापूर दौऱ्यादरम्यान भारतीय जनता पक्षाच्यावतीने आयोजित नवमतदार नोंदणी अभियानास उपस्थिती लावली.

कोल्हापुरातील सायबर चौक येथे आयोजित या नवमतदार नोंदणी अभियान प्रसंगी बोलतांना पाटील म्हणाले लोकशाहीत मतदार हा राजा असतो. लोकशाहीला सशक्त करण्यासाठी नवमतदारांनी देखील मतदानाचा हक्क उत्स्फूर्तपणे बजावला पाहिजे. यासोबतच त्यांनी नाव नोंदणी झालेल्या नवमतदारांचे आभार मानले. तसेच, ज्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट नाहीत, त्यांनी या अभियानाचा लाभ घेऊन लोकशाही बळकट करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन केले.

नवमतदार नाव नोंदणीस युवक वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी कोल्हापूर भाजपचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

 

May be an image of 12 people