“सर्वात मोठी घोषणा…” शरद सोनवणेंच्या त्या फ्लेक्सने जिल्ह्यात चर्चांना उधाण

पुणे : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींनी देशातील राजकारणाची दिशा बदलण्याचे वेळोवेळी केले आहे. अनके राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू महाराष्ट्रात असल्याचे मागील काही महिन्यामध्ये पाहायला मिळाले. पुण्यातील शिवजन्मभूमी जुन्नर येथे माजी आमदार शरद सोनवणे यांनी लावलेले बॅनर भविष्यातील राजकीय भूकंपाची नंदी तर नाही ना ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

२९ सप्टेंबर २०२३ सर्वात मोठी घोषणा होणार..! अशा आशयाचे भले मोठे बॅनर माजी आमदार शरद सोनावणे यांच्याकडून तालुक्यात लावण्यात आले आहेत. सोनवणेंची हि सर्वात मोठी घोषणा एखादा प्रकल्प असणार कि राजकीय परिवर्तन ? याकडे सर्व नागरिकांचे आणि जाणकारांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सत्तेचे वाटेकरी झाल्यानंतर अनेक आमदार अजित पवारांसोबत आले पण जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी सावध भूमिका घेत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. यामागे मोठ्या पवारांसोबत असणारे बेनके यांचे सलोख्याचे संबंध आणि पक्ष फुटीचे भविष्यतील नुकसान टाळणे कारण असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.

सोनावणेंची हि “सर्वात मोठी घोषणा” नक्की कोणाची डोकेदुखी ठरणार ? कि एखादा प्रकल्प तालुक्याला मिळणार ? जाणून घेण्याची उत्सुकता शिवजन्मभूमी जुन्नरकर नागरिकांना लागली आहे.