भाजपा कोल्हापूरच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

कोल्हापूर : भाजपा कोल्हापूर जिल्हा आणि शहर कार्यकारणीची निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम नुकताच भाजपा कार्यालयामध्ये राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. चंद्रकांत पाटील यांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
पाटील यांच्या हस्ते यावेळी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आहे. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस चंद्रकांत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी देखील उपस्थित राहून सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील आगामी सर्वच निवडणुकांमध्ये नवीन पदाधिकाऱ्यांसोबत एकमेकांच्या सहकार्याने आणि एकदिलाने विजय खेचून आणूया, असा विश्वास यावेळी दिला. यावेळी भाजपा कोल्हापूरचे भाजपा सर्व आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, बुथ अध्यक्ष यांनी मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते.