ज्या ग्रंथालयांना ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत त्यांना ५ लाख रुपये व ५० वर्षे पूर्ण झालेल्या ग्रंथालयांना ३ लाख रुपये अनुदान दिले जाणार – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कोल्हापुरातील करवीर नगर येथे वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या वाचन मंदिराच्या नूतन वास्तूचे उदघाटन केले.

कोल्हापूर येथील करवीर नगर येथे वाचन मंदिर उभारण्यात आले आहे. या नवीन वास्तूचे उदघाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चंद्रकांत यांनी स्पष्ट केले कि, ग्रंथालयांच्या नियमावलीमध्ये बदल करण्याचे काम सुरू असून सार्वजनिक ग्रंथालयांना ऑनलाईन वेतन जमा करणार आहे.

ज्या ग्रंथालयांना ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत त्यांना ५ लाख रुपये व ५० वर्षे पूर्ण झालेल्या ग्रंथालयांना ३ लाख रुपये अनुदान दिले जाणार असल्याची घोषणा चंद्रकांत पाटील यांनी याप्रसंगी केली. अनुदानाव्यतिरिक्त अधिक पुस्तकेही दिली जाणार असल्याचे याप्रसंगी पाटील यांनी नमूद केले.