उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि इन्फोसीस यांच्यात सामंजस्य करार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलांची माहिती

मुंबई : आज मंत्रालयात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये एसजीबीएस उन्नती फाउंडेशन बँगलोर या संस्थेमार्फत तयार करण्यात आलेला १६५ तासांचा इंग्रजी संवाद कौशल्य आणि मूल्ये आधारित जीवनशैली (English Communication, Values and Life Skills) अभ्यासक्रम संदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि इन्फोसीस यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर , उन्नती फाउंडेशन, बँगलोर संचालक रमेश स्वामी, इन्फोसीसचे मुख्य अधिकारी संतोष अंतपूरा उपस्थित होते. या सामंजस्य करारावर तंत्रशिक्षण संचालक डॉ.विनोद मोहितकर यांनी व इन्फोसीस उन्नती फाउंडेशन बँगलोर तर्फे रमेश स्वामी यांनी स्वाक्षरी केली.