भविष्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील रुग्णांच्या सेवेसाठी आरोग्य सेवेचे कार्य निरंतर सुरु ठेवण्याचा संकल्प – चंद्रकांत पाटील

पुणे : आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील रुग्णांना उपचारासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागते. यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून आणि एमएनजीएलच्या साहाय्याने समर्थ युवा फाउंडेशनच्या वतीने पुणेकरांसाठी मोबाईल मेडिकल विकसीत करण्यात आले होते. आज या मोबाईल व्हॅनने बारा हजार तपासण्यांचा टप्पा पूर्ण केला आहे.

मोबाईल व्हॅनने बारा हजार तपासण्यांचा टप्पा पूर्ण केला कारणाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.   रुग्णसेवा ही ईश्वर सेवा मानली जाते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील रुग्णांना उपचारासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागते,असे  मत यावेळी पाटील यांनी व्यक्त केले. या व्हॅनच्या माध्यमातून महिलांमधील स्तनांचा कॅन्सर (मॅमोग्राफी), तोंडाचा कॅन्सर, सईबसी, ब्लड शूगर, रक्तदाब आदी अतिशय खर्चिक तपासण्या विनामूल्य करण्यात येतात. यंदाच्या वारीत, असंख्य वारकरी बांधव आणि मातांनी याचा लाभ घेतला होता अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
भविष्यातही आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील रुग्णांच्या सेवेसाठी आरोग्य सेवेचे कार्य निरंतर सुरु ठेवण्याचा संकल्प राहील, असे मतही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.