# First Maharashtra ## Posts - [गणित ऑलिम्पियाडमध्ये भारतीय मुलींचा डंका; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला अभिमान, श्रेया मुंदडाचे विशेष कौतुक](https://firstmaharashtra.com/2026/04/17/indian-girls-excel-in-mathematics-olympiad-minister-chandrakant-patil-expresses-pride-heaps-special-praise-on-shreya-mundada/): मुंबई : फ्रान्समध्ये नुकत्याच पार पडलेल्या १५ व्या ‘युरोपियन गर्ल्स मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाड’ (EGMO) मध्ये भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. जगातील ६७ देशांच्या चुरशीच्या स्पर्धेत भारतीय संघाने सहावा क्रमांक पटकावून जागतिक स्तरावर आपल्या गणितातील कौशल्याची मोहोर उमटवली आहे. विशेष म्हणजे, मुंबईची सुकन्या श्रेया मुंदडा हिने या प्रतिष्ठित स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून देशासाठी सुवर्णमयी इतिहास रचला आहे. मुंबईची रहिवासी असलेल्या श्रेया शंतनू मुंदडा हिने या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. श्रेया व्यतिरिक्त भारतीय संघातील संजना फिलो चाको (केरळ) हिने रजतपदक, तर शिवानी भारथ कुमार (तमिळनाडू) हिने कांस्यपदक जिंकले आहे. भारताने मिळवलेला सहावा क्रमांक हा या स्पर्धेच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वोत्तम […] - [मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'चितळे बंधू व्हिजन पार्क'चे उदघाटन व कोनशिला अनावरण सोहळा उत्साहात संपन्न](https://firstmaharashtra.com/2026/04/17/the-inauguration-and-cornerstone-unveiling-ceremony-of-chitale-bandhu-vision-park-was-celebrated-with-great-enthusiasm-at-the-hands-of-chief-minister-devendra-fadnavis/): पुणे : भोर, पुणे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘चितळे बंधू व्हिजन पार्क’ चे उद्घाटन व कोनशिला अनावरण संपन्न झाले. याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. यावेळी या भव्य प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. मंत्री पाटील यांनी मुख्यमंत्री महोदयांसोबत प्लांटमधील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती घेतली. या प्रसंगी आमदार भीमराव तापकीर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, चितळे बंधूचे व्यवस्थापकीय भागीदार इंद्रनील चितळे व इतर मान्यवर उपस्थित होते. ‘चितळे’ हा एक ग्लोबल ब्रँड झाला असून 35 देशांमध्ये पोहोचला असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. तसेच हा ब्रँड उर्वरित देशांमध्येही पोहोचेल असे प्रतिपादन केले. चितळे बंधूंच्या 4 पिढ्यांनी विविध […] - [मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसचा कोनशिला समारंभ संपन्न](https://firstmaharashtra.com/2026/04/17/groundbreaking-ceremony-of-the-lata-asha-mangeshkar-institute-of-medical-sciences-concluded-in-the-presence-of-the-chief-minister/): पुणे : पुणे येथे लतादीदी आणि आशाताई यांच्या नावाने जनसेवेसाठी उभारल्या जाणाऱ्या ‘लताआशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ चा कोनशिला अनावरण सोहळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख प्रमुख उपस्थिती होती. सामान्यांना माफक दरात अत्याधुनिक आरोग्य सुविधा मिळाव्यात, हा या प्रकल्पामागचा उदात्त हेतू अत्यंत कौतुकास्पद असल्याचे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. या सेवायज्ञाला पाटील यांनी मनापासून शुभेच्छा देखील दिल्या. याप्रसंगी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे, लता मंगेशकर फाउंडेशनचे अध्यक्ष पंडित हृदयनाथ मंगेशकर, […] - [ऑनर्स’ व ‘ऑनर्स विथ रिसर्च’ अभ्यासक्रमासाठी तीन दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील](https://firstmaharashtra.com/2026/04/17/three-day-online-training-organized-for-honours-and-honours-with-research-courses-higher-and-technical-education-minister-chandrakant-patil/): मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या दिशेने राज्यात महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमातील ‘ऑनर्स’ व ‘ऑनर्स विथ रिसर्च’च्या चौथ्या वर्षाच्या अंमलबजावणीसंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि उच्च शिक्षण संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील सर्व वरिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य, संचालक, प्राध्यापकांसाठी तीन दिवसीय विशेष ऑनलाईन प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्व संबंधितांचा सहभाग अनिवार्य राहणार असल्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात आघाडीवर असून, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून राज्यात चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमातील चौथे वर्ष लागू होत आहे. या नव्या टप्प्याची प्रभावी […] - [प्रत्येक बूथ स्तरावर संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि केंद्र व राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजना घराघरात पोहोचवण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावे, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन](https://firstmaharashtra.com/2026/04/16/minister-chandrakant-patil-appeals-to-everyone-to-commit-themselves-to-further-strengthening-the-organization-at-every-booth-level-and-to-ensuring-that-the-welfare-schemes-of-the-central-and-state-gov/): पुणे : पुणे येथे भाजपा छत्रपती शिवाजीनगर मंडलाचा ‘कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग’ संपन्न झाला. या प्रशिक्षण शिबिरात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून उपस्थित सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना पाटील म्हणाले, भारतीय जनता पार्टी हा केवळ राजकीय पक्ष नसून विचारांनी प्रेरित असलेले एक कुटुंब आहे. ‘संघटन’ हाच आपल्या कार्याचा मुख्य आधारस्तंभ असल्याने, आगामी काळात प्रत्येक बूथ स्तरावर संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि केंद्र व राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजना घराघरात पोहोचवण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावे, असे आवाहन यावेळी पाटील यांनी केले. याप्रसंगी पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, महापालिकेतील आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या […] - [पुण्यात 'आमदार चषक २०२६' क्रिकेट स्पर्धेचा धडाक्यात शुभारंभ; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न](https://firstmaharashtra.com/2026/04/16/mla-cup-2026-cricket-tournament-kicks-off-with-a-bang-in-pune-inaugurated-by-minister-chandrakant-patil/): पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांच्या वाढदिवसानिमित्त ‘हेमंत रासने प्रतिष्ठान’च्या वतीने आयोजित ‘आमदार चषक २०२६’ या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात शुभारंभ संपन्न झाला. या प्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी हेमंत रासने यांचे अभिष्टचिंतन करून, स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. ही स्पर्धा पुढील काही दिवस कसब्यातील क्रीडा रसिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. या स्पर्धेत संपूर्ण पुणे शहरातून सुमारे ९६ हून अधिक संघांनी सहभाग नोंदवला असून, खेळाडूंमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला आकर्षक ‘आमदार चषक’ देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच उपविजेत्या आणि […] - [बारामतीत विजयाचा निर्धार आणि पुण्यात स्नेहबंधांचा जागर; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा झंझावाती दौरा](https://firstmaharashtra.com/2026/04/16/a-resolve-for-victory-in-baramati-and-a-celebration-of-bonds-in-pune-minister-chandrakant-patils-whirlwind-tour/): पुणे : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी बारामती आणि पुणे शहराचा दौरा करून राजकीय रणनीतीचा आढावा घेण्यासोबतच सामाजिक स्नेहबंध जोपासले. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून महायुतीच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला. बारामती दौऱ्यात पाटील यांनी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब गावडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी गावडे कुटुंबियांशी संवाद साधून त्यांनी स्थानिक राजकीय व सामाजिक घडामोडींवर सविस्तर चर्चा केली. त्यानंतर, पुणे येथे मार्केट कमिटीचे माजी सभापती दिलीप आप्पा खैरे यांच्या निवासस्थानी महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पोटनिवडणुकीच्या नियोजनाचा आढावा घेत, महायुतीच्या उमेदवार सुनेत्रावहिनी पवार यांना प्रचंड बहुमताने […] - [साऊंड, डीजे खर्च टाळून, गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना तब्बल पाच लाख रुपयांची शिष्यवृत्ती; नगरसेवक तुषार हिंगे यांचा स्तुत्य उपक्रम](https://firstmaharashtra.com/2026/04/15/by-foregoing-expenses-on-sound-systems-and-djs-a-scholarship-worth-a-staggering-five-lakh-rupees-awarded-to-meritorious-and-needy-students-a-commendable-initiative-by-corporator-tushar-hinge/): पिंपरी – चिंचवड : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण हे वाघीनीचे दूध आहे त्यामुळे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र समाजाला दिला.  १४ एप्रिल २०२६ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून, त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने शहराचे माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक तुषार रघुनाथ हिंगे व आरंभ सोशल फाउंडेशन यांच्या माध्यमातून दरवर्षी साउंड व होणार इतर खर्च टाळून पिंपरी विधानसभेतील प्रभाग क्रमांक १० मधील लालटोपीनगर मोरवाडी, विद्यानगर, इंदिरानगर, दत्त नगर, परशुराम नगर, शंकरनगर व अण्णासाहेब नगर वसाहतीतील गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून तब्बल पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. दहावी […] - [बारामती पोटनिवडणुकीसाठी मंत्री चंद्रकांत पाटील मैदानात; कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याचे आवाहन](https://firstmaharashtra.com/2026/04/15/minister-chandrakant-patil-enters-the-fray-for-baramati-bypoll-urges-party-workers-to-work-with-full-vigor/): पुणे : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज बारामती मतदारसंघाचा झंझावाती दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी विविध मंडळांचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घेऊन निवडणूक रणनीतीचा आढावा घेतला, तसेच महायुतीच्या उमेदवार सुनेत्रावहिनी पवार यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांना विजयाचा मंत्र दिला. दौऱ्याची सुरुवात करताना पाटील यांनी बारामती तालुका दक्षिण मंडल अध्यक्ष सुनीलजी माने यांच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारने केलेली विकासकामे घराघरांत पोहोचवून सुनेत्रा वहिनींना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी आता सर्वांनी जोमाने कामाला लागावे. त्यानंतर त्यांनी पश्चिम मंडल अध्यक्ष शाम कोकरे यांच्या निवासस्थानी भेट देऊन कोकरे […] - [डॉ. बाबासाहेबांचे विचार हीच समाजपरिवर्तनाची ऊर्जा; पुण्यात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भीम अनुयायांची भेट घेऊन जयंतीच्या दिल्या शुभेच्छा](https://firstmaharashtra.com/2026/04/15/dr-babasahebs-thoughts-are-the-very-energy-for-social-transformation-in-pune-minister-chandrakant-patil-met-with-followers-of-dr-babasaheb-and-extended-his-greetings-on-the-occasion-of-his-birth/): पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या वतीने आयोजित विशेष अभिवादन सोहळ्यात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून महामानवाच्या स्मृतींना पुष्पहार अर्पण केला. यावेळी त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भीम अनुयायांची भेट घेऊन त्यांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, डॉ. बाबासाहेबांचे विचार हे केवळ शब्द नसून ती समाजपरिवर्तनाची ऊर्जा आहे. महामानवाच्या या विचारांमुळेच आज देशाला एक भक्कम संविधान आणि समतेची दिशा मिळाली आहे. या सोहळ्याचे आयोजन अत्यंत प्रेरणादायी पद्धतीने करण्यात आले होते. या सोहळ्यास उपमहापौर परशुराम वाडेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू पराग […] - [डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एरंडवणेत मोफत आरोग्य शिबीर; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन](https://firstmaharashtra.com/2026/04/15/free-health-camp-in-erandwane-on-the-occasion-of-dr-babasaheb-ambedkar-jayanti-inaugurated-by-minister-chandrakant-patil/): पुणे : कोथरूडमधील एरंडवणे भागात, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त प्रभाग क्रमांक २९ च्या अध्यक्षा ॲड. प्राचीताई बगाटे यांच्या संकल्पनेतून ‘मोफत नेत्र आणि दंत तपासणी शिबिरा’चे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उदघाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला आणि जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. बाबासाहेबांचा ‘शिक्षण आणि आरोग्य’ यांवरील विचार केंद्रस्थानी ठेवून राबवलेला हा उपक्रम खरोखर कौतुकास्पद असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले. या शिबिरात एरंडवणे भागातील शेकडो नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. या कार्यक्रमास अध्यक्ष गिरीश खत्री, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, माजी नगरसेवक जयंत […] - ['समतेचा विचार केवळ भाषणात नको, तर कृतीत हवा'; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी सफाई कामगार आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी एकत्र केले महामानवास अभिवादन](https://firstmaharashtra.com/2026/04/14/the-ideal-of-equality-must-not-remain-merely-in-speeches-but-be-reflected-in-action-sanitation-workers-and-high-ranking-officials-joined-together-to-pay-tribute-to-the-great-leader-at-the-reside/): पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे केवळ एक उत्सव नाही, तर त्यांनी दिलेल्या ‘समता, न्याय आणि बंधुभावाच्या’ विचारांचे आचरण करण्याची संधी आहे. याच भावनेतून, यंदा महामानवाच्या १३५ व्या जयंतीनिमित्त केवळ औपचारिक अभिवादन न करता, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ‘देवाशिष’ निवासस्थानी एक वेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम राबवून नवा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, डॉ. बाबासाहेबांनी दिलेला समतेचा मंत्र केवळ भाषणांपुरता मर्यादित न ठेवता, तो कृतीतून उतरवणे हेच त्यांना खरे अभिवादन आहे. याच विचाराने, कोथरूडमधील आमचे सफाई कामगार बांधव, कष्टकरी माता-भगिनी, विद्यार्थी आणि उच्चपदस्थ अधिकारी – अशा समाजातील सर्व स्तरांतील […] - [पुणे रेल्वे स्टेशन येथे महामानवास मंत्री चंद्रकांत पाटील यांचे अभिवादन; 'एकता मिसळ'द्वारे समतेचा जागर](https://firstmaharashtra.com/2026/04/14/greetings-from-honble-minister-for-human-resources-chandrakant-patil-at-pune-railway-station-awareness-of-equality-through-ekta-misal/): पुणे : भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यातील विविध कार्यक्रमांत सहभागी होऊन महामानवास विनम्र अभिवादन केले. रेल्वे स्टेशन येथील स्मारकास भेट देऊन पाटील यांनी बुद्ध वंदना घेतली आणि तथागतांचे स्मरण केले. याप्रसंगी आमदार चेतन तुपे, महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, गटनेते गणेश बिडकर आणि भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘एकता मिसळ’चा आस्वाद आणि समतेचा संदेश अभिवादन सोहळ्यानंतर मंत्री पाटील यांनी माजी आमदार दीपक पायगुडे यांच्या संकल्पनेतून आयोजित ‘भव्य एकता मिसळ’ कार्यक्रमाला भेट दिली. जयंतीनिमित्त शहरात येणाऱ्या अनुयायांसाठी आयोजित […] - [आदरणीय गीता ताई गुंडे यांच्या जीवनप्रवासावरील पुस्तकाचे मुंबईत प्रकाशन; मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती](https://firstmaharashtra.com/2026/04/14/book-on-the-life-journey-of-respected-geeta-tai-gunde-released-in-mumbai-minister-chandrakant-patil-presides-as-chief-guest/): मुंबई : सामाजिक कार्याचा वसा घेऊन चार दशकांहून अधिक काळ अविरत कार्य करणाऱ्या, असंख्य कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शक आदरणीय गीता ताई गुंडे यांच्या जीवनप्रवासावर आधारित पुस्तकाचे सोमवारी मुंबईत प्रकाशन झाले. या प्रकाशन सोहळ्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पाटील म्हणाले, गीता ताईंनी आपले संपूर्ण आयुष्य ध्येयवादाने आणि निस्वार्थ भावनेने समाजकार्यासाठी अर्पण केले. राष्ट्र उभारणीत महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी त्यांनी केलेले कष्ट आणि दिलेली दिशा खरोखरच वंदनीय आहे. श्रद्धेय भैयाजी जोशी आणि वंदनीय शांताक्का यांच्या उपस्थितीत झालेला हा सोहळा ताईंच्या तपस्येचा सन्मान करणारा ठरला. हे पुस्तक केवळ एका व्यक्तीचा प्रवास नसून, एका समर्पित जीवनशैलीचा दस्तऐवज आहे. ताईंच्या […] - [भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजात समतेची भावना अधिक बळकट करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली - मंत्री चंद्रकांत पाटील](https://firstmaharashtra.com/2026/04/14/strengthening-the-spirit-of-equality-within-society-by-upholding-the-ideals-of-bharat-ratna-dr-babasaheb-ambedkar-constitutes-the-truest-tribute-to-him-minister-chandrakant-patil/): मुंबई : भारतीय संविधानाचे शिल्पकार, प्रज्ञासूर्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी मंत्रालय, मुंबई येथे वित्त विभागाच्या नोंदणी शाखेत त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यालयाला सुट्टी असल्याने त्याच्या पूर्वसंध्येलाच हा अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी पाटील म्हणाले, बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळेच देशात लोकशाही, समता आणि न्यायाची भक्कम पायाभरणी झाली आहे. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजात समतेची भावना अधिक बळकट करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. या प्रसंगी वित्त विभागाच्या नोंदणी शाखेतील मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. - [डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी 'स्नेहसंवाद' सोहळ्याचे आयोजन](https://firstmaharashtra.com/2026/04/13/a-snehsamvad-cordial-interaction-ceremony-was-organized-at-the-residence-of-minister-chandrakant-patil-on-the-occasion-of-dr-babasaheb-ambedkar-jayanti/): पुणे: भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार, १४ एप्रिल रोजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड येथील ‘देवाशिष’ निवासस्थानी अभिवादन व स्नेहसंवाद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा दिवस हा चैतन्य आणि प्रेरणेचा दिवस असून, त्यांच्या बुद्धी, तर्क आणि करुणेच्या विचारांचा जागर करण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत होणाऱ्या या अनौपचारिक सोहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी होऊन महामानवाच्या स्मृतींना अभिवादन करणार आहेत. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील स्वतः उपस्थितांशी संवाद साधणार असून, महामानवाचे विचार राष्ट्रनिर्मितीसाठी कसे दिशादर्शक आहेत, […] - ["माझी जडणघडण 'ज्ञानेश्वरी'च्या सावलीत झाली"; पुण्यात पुरस्कार सोहळ्यात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भावना](https://firstmaharashtra.com/2026/04/13/my-upbringing-took-place-in-the-shadow-of-the-dnyaneshwari-minister-chandrakant-patil-shares-his-sentiments-at-an-awards-ceremony-in-pune/): पुणे : पुणे येथे संत विचार प्रबोधिनी आणि डॉ. रामचंद्र देखणे साहित्य कला प्रतिष्ठानच्या वतीने एका अत्यंत प्रेरणादायी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मंत्री उदय सामंत यांच्या समवेत, संत नामदेव महाराजांचे १६ वे वंशज हभप केशव महाराज नामदास यांना ‘डॉ. रामचंद्र देखणे स्मृती कीर्तनसेवा पुरस्कार’ आणि पंढरपूरच्या प्रसिद्ध भारुडसम्राज्ञी चंदाताई तिवाडी यांना ‘लोककला सेवा पुरस्कार’ प्रदान केला. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, स्वतःची जडणघडण ही ‘ज्ञानेश्वरी’च्या सावलीत आणि त्यातील विचारांमुळे झाली आहे, त्यामुळे वारकरी संप्रदायाशी माझे एक अतूट आणि जिव्हाळ्याचे नाते आहे. समाजप्रबोधन करताना वारकरी बांधव सामान्यातल्या […] - [पुणेकरांच्या सुखकर प्रवासासाठी मेट्रोचे जाळे अधिक विस्तारणार - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील](https://firstmaharashtra.com/2026/04/12/metro-network-to-expand-further-for-the-commuting-comfort-of-pune-residents-higher-and-technical-education-minister-chandrakant-patil/): पुणे : कोथरुड मतदारसंघातील कर्वेनगर आणि वारजे परिसराला जोडणाऱ्या मेट्रो ४ आणि ४ ए प्रकल्पाच्या प्रस्तावित आराखड्यास नुकतीच मंजुरी मिळाली असून, या प्रकल्पाची सविस्तर माहिती स्थानिक नागरिकांना मिळावी यासाठी पुणे मेट्रोच्या वतीने आयोजित सादरीकरण कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पाटील म्हणाले, २०१६ साली जेव्हा पुण्यात मेट्रोचे आगमन झाले, तेव्हा अनेक जण याकडे एक ‘दिवास्वप्न’ म्हणून पाहत होते; पण आज त्याच मेट्रोने पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासाचा चेहरामोहरा बदलला असून ती जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. या प्रवासात आता कोथरुडचा हा नवा टप्पा मैलाचा दगड ठरेल. याप्रसंगी बोलताना पाटील यांनी हिंजवडी मेट्रो […] - [भारतीय संगीतविश्वातील लोकप्रिय आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन ... एक सूर निःशब्द झाला - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील](https://firstmaharashtra.com/2026/04/12/the-passing-of-asha-bhosle-a-popular-and-veteran-singer-of-the-indian-music-world-a-melody-has-fallen-silent-chandrakant-patil-minister-for-higher-and-technical-education/): पुणे : भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज गायिका आशा भोसले यांनी आज जगाचा निरोप घेतला. मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या दुपारी चार वाजता त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्कमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तब्बल आठ दशकांहून अधिक काळ आपल्या चिरतरुण आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आशाताई आज आपल्यात नाहीत याबातमीने संपूर्ण चित्रपटसृष्टीसह जगभरातील गायन व कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील हालहाल व्यक्त केली. चंद्रकांत पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले, आशाताई भोसले यांच्या निधनामुळे सप्तसुरांपैकी एक सूरच जणू निःशब्द झाला आहे. महाराष्ट्र, भारतच […] - [सरकारी योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवा; पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन](https://firstmaharashtra.com/2026/04/12/ensure-the-benefits-of-government-schemes-reach-citizens-at-the-grassroots-level-minister-chandrakant-patil-appeals-to-party-workers-in-pune-cantonment/): पुणे : पुणे येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभर आयोजित करण्यात येत असलेल्या पंडित दीनदयाल उपाध्याय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गांच्या अनुषंगाने पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील प्रशिक्षण वर्गात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करावे, असे आवाहन यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केले. भारतीय जनता पार्टीच्या वतीने दरवर्षी कार्यकर्त्यांची वैचारिक जडणघडण व्हावी आणि पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचावीत, या उद्देशाने या प्रशिक्षण वर्गांचे आयोजन केले जाते. २०२६ मध्ये हे अभियान विशेषतः स्थानिक […] - [महात्मा फुले यांचा समतेचा विचार केवळ भाषणापुरता मर्यादित न ठेवता तो प्रत्यक्ष कृतीत उतरवणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य - मंत्री चंद्रकांत पाटील](https://firstmaharashtra.com/2026/04/12/it-is-the-duty-of-us-all-to-translate-mahatma-phules-philosophy-of-equality-into-concrete-action-rather-than-limiting-it-merely-to-speeches-minister-chandrakant-patil/): पुणे : सामाजिक क्रांतीचे जनक, क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त (द्विशताब्दी वर्ष) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड येथील निवासस्थानी त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी पाटील म्हणाले, महात्मा फुले यांचा समतेचा विचार केवळ भाषणापुरता मर्यादित न ठेवता तो प्रत्यक्ष कृतीत उतरवणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे, अशी भावना यावेळी व्यक्त केली. मुलींच्या शिक्षणासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना अनुसरून महाराष्ट्र शासनाने घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय समाज परिवर्तनाला नवी दिशा देणारे आहेत, असेही पाटील यांनी म्हटले. या प्रसंगी राजर्षी शाहू महाराजांचे वंशज मालोजीराजे छत्रपती, आ. योगेश टिळेकर, भाजपा ओबीसी आघाडीचे अध्यक्ष विकास लवटे, […] - [महिलांना लोकसभेत आणि विधानसभेत आरक्षण देण्याचा निर्णय हे महात्मा फुले यांना खरे अभिवादन -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस](https://firstmaharashtra.com/2026/04/11/the-decision-to-provide-reservation-for-women-in-the-lok-sabha-and-legislative-assemblies-is-a-true-tribute-to-mahatma-phule-chief-minister-devendra-fadnavis/): पुणे : पुणे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्या शुभहस्ते ‘ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळा, खानवडी’चे लोकार्पण व कोनशिला अनावरण उत्साहात संपन्न झाले. याच सोहळ्याचे औचित्य साधून ‘क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २०० व्या जन्मशताब्दी वर्षा’चा देखील शानदार शुभारंभ करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना लोकसभा व विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून तो महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्त्री-शिक्षण व महिला सक्षमीकरणाच्या विचारांना अनुरूप असून त्यांना खरी आदरांजली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. या कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री जयकुमार […] - [महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त 'फुले वाड्या'त अभिवादन; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वाहिली आदरांजली](https://firstmaharashtra.com/2026/04/11/tributes-paid-at-phule-wada-on-the-occasion-of-mahatma-phules-bicentenary-birth-anniversary-minister-chandrakant-patil-pays-homage/): पुणे : क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीचे (२०० वी जयंती) औचित्य साधून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यातील पवित्र ‘फुले वाडा’ येथे जाऊन फुले दाम्पत्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले. समाजातील अज्ञान आणि अंधकार दूर करून ज्ञानाची ज्योत पेटवणाऱ्या या महामानवाचा वारसा आम्हा सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी असल्याचे पाटील यांनी यावेळी नमूद केले. फुले वाड्यात अभिवादन केल्यानंतर पाटील यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला आणि महात्मा फुले यांच्या विचारांची प्रासंगिकता अधोरेखित केली. समता, शिक्षण आणि सामाजिक न्याय यांचा संदेश देणाऱ्या महात्मा फुलेंच्या विचारांना आपण सर्वांनी पुढे नेण्याचा संकल्प करूया, असे आवाहन यावेळी करण्यात आले. याप्रसंगी पुणे […] - [महाराष्ट्रात ५४ हजार कोटींची मोठी गुंतवणूक!... राज्याच्या औद्योगिक, आर्थिक प्रगतीला नवी दिशा आणि उज्ज्वल भविष्याची नांदी - मंत्री चंद्रकांत पाटील](https://firstmaharashtra.com/2026/04/10/a-massive-investment-of-%e2%82%b954000-crore-in-maharashtra-a-new-direction-for-the-states-industrial-and-economic-progress-and-a-harbinger-of-a-bright-future-minister-chandrakant-pati/): मुंबई : राज्याच्या औद्योगिक विकासाला मोठी गती देणारा निर्णय आज घेण्यात आला आहे. व्हिएतनाममधील जगप्रसिद्ध ‘विन ग्रुप’ (VinFast) या कंपनीने महाराष्ट्रात तब्बल $६.५ अब्ज (५४,००० कोटी रुपये) गुंतवणुकीचा सामंजस्य करार केला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या गुंतवणुकीबद्दल समाधान व्यक्त करत हा महाराष्ट्राच्या जागतिक प्रतिष्ठेचा विजय असल्याचे म्हटले आहे. पाटील यांनी नमूद केले कि, या प्रकल्पामुळे राज्यात रोजगाराचे एक मोठे जाळे विणले जाणार आहे. विशेषतः आपल्या महाराष्ट्रातील हजारो कुशल तरुणांच्या हाताला काम मिळणार असून, त्यांच्या भविष्याला एक नवी उभारी मिळेल. जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणावर जागतिक कंपन्या महाराष्ट्रात येतात, तेव्हा केवळ उद्योगच वाढत नाहीत, तर त्यासोबतच रस्ते, […] - [मंत्री चंद्रकांत पाटील यांची 'अभाविप' केंद्रीय कार्यालयाला सदिच्छा भेट... राष्ट्रहित आणि शैक्षणिक विषयांवर झाली चर्चा](https://firstmaharashtra.com/2026/04/10/minister-chandrakant-patil-pays-a-courtesy-visit-to-the-abvp-central-office-discussions-held-on-national-interest-and-educational-matters/): मुंबई : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईतील ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ (ABVP) च्या केंद्रीय कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी अभाविपचे संघटन मंत्री गीतेशजी चव्हाण आणि इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर संवाद साधला. या महत्त्वपूर्ण भेटीत प्रामुख्याने राज्यातील राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील सद्यस्थिती, नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या भविष्यातील संधी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तरुणाईच्या मनात राष्ट्रहित आणि दर्जेदार शिक्षणाबद्दल असलेली ओढ पाहून पाटील यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थी शक्ती हीच राष्ट्रशक्ती असून, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन सर्वतोपरी […] - [उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सावली केअर सेंटर'ला दिली सदिच्छा भेट](https://firstmaharashtra.com/2026/04/10/minister-of-higher-and-technical-education-chandrakant-patil-paid-a-goodwill-visit-to-the-savali-care-center/): मुंबई : मुंबईतील दादर-नायगाव येथील ‘सावली केअर सेंटर’ ला आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान पाटील यांनी सेंटरमध्ये रुग्णांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवा, उपलब्ध अद्ययावत वैद्यकीय सुविधा आणि एकंदरीत व्यवस्थापनाचा सविस्तर आढावा घेतला. याबाबत आपल्या भावना व्यक्त करताना पाटील म्हणाले, ‘सावली’मध्ये रुग्णांची ज्या मायेने आणि तत्परतेने देखभाल केली जाते, ते पाहून समाधान वाटले. कठीण काळात रुग्णांना आधार देण्याचे हे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. येणाऱ्या काळातही रुग्णांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना अधिकाधिक दर्जेदार आणि उत्तम आरोग्य सेवा कशा पुरवता येतील, यावर भर देण्याच्या सूचना यावेळी पाटील यांनी उपस्थित पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. रुग्णसेवा […] - [विद्यापीठे, महाविद्यालयांमधील रिक्त पदभरतीचा मार्ग मोकळा होणार; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा](https://firstmaharashtra.com/2026/04/08/the-path-for-filling-vacant-posts-in-universities-and-colleges-is-set-to-clear-higher-and-technical-education-minister-chandrakant-patil-conducts-a-review/): मुंबई : राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालये आणि ग्रंथालयांमधील रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत भरती प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालये आणि ग्रंथालयांमधील रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेत येणाऱ्या विविध अडचणींचा आढावा यावेळी पाटील यांनी घेतला, तसेच यावर तातडीने काय उपाययोजना करता येतील, याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा देखील त्यांनी केली. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये पूर्ण क्षमतेने मनुष्यबळ असणे आवश्यक आहे. रिक्त पदे भरण्याबाबत असलेल्या अडचणींवर कालबद्ध पद्धतीने मात करून ही प्रक्रिया गतिमान करण्यात येईल, […] - [‘विकसित महाराष्ट्र व्हिजन-२०४७’ ची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न... दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राला अग्रेसर करण्यासाठी व्यापक उद्देश ठेवून ठोस अंमलबजावणीवर भर द्या - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस](https://firstmaharashtra.com/2026/04/08/significant-meeting-on-developed-maharashtra-vision-2047-concludes-focus-on-concrete-implementation-with-the-broad-objective-of-making-maharashtra-a-leader-in-per-capita-income/): मुंबई  : राज्य आणि देशासाठी २०२६ ते २०३० हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा आहे. या काळात योग्य निर्णय आणि अंमलबजावणी झाली, तर महाराष्ट्राला केवळ मोठी अर्थव्यवस्था नव्हे, तर दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राला अग्रेसर राज्य बनविणे शक्य होणार आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्राच्या दीर्घकालीन प्रगतीसाठी तयार करण्यात आलेल्या ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या महत्त्वाकांक्षी व्हिजनच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुढील चार वर्षांत 2030 पर्यंत मोजता येण्याजोगी उद्दिष्टे साध्य करण्यावर विभागांनी भर द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथी गृह येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विकसित महाराष्ट्र व्हीजन 2047 अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी गठीत व्हीजन व्यवस्थापन नियामक मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण […] - [उद्योगांच्या गरजेनुसार विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी आधुनिक प्रयोगशाळा तंत्रज्ञान उपलब्ध होणार - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील](https://firstmaharashtra.com/2026/04/08/modern-laboratory-technology-will-be-made-available-for-the-skill-development-of-students-in-accordance-with-the-needs-of-industries-higher-and-technical-education-minister-chandrakant-pati/): मुंबई : राज्यात अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये असलेल्या प्रयोगशाळातील तंत्रज्ञान सध्याच्या उद्योगांच्या गरजेनुसार असले पाहिजे. महाविद्यालयांकडे असलेल्या प्रयोगशाळा आधुनिक तंत्रज्ञानाने अधिक सक्षम असल्यास सद्यस्थितीतील व भविष्यातील उद्योगांच्या गरजेनुसार विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित करणे शक्य होईल. असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत तंत्रशिक्षण संचालनालय आणि मेकर भवन फाऊंडेशन यांच्या शासकीय निवासस्थान सिंहगड,मुंबई येथे सामंजस्य करार करण्यात आला. करारामुळे राज्यातील स्वायत्त अभियांत्रिकी पदवी संस्थांमध्ये मेकर भवन फाउंडेशनमार्फत प्रयोगशाळांचे अ‌द्यावतीकरण करणे शक्य होणार आहे. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.विनोद मोहितकर, सह संचालक डॉ. सुनील […] - [मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश.. कोथरुडमधील 'मिसिंग लिंक'च्या कामाला गती; बालेवाडी-वाकड पूल रस्ता भूसंपादनाची अधिसूचना जारी](https://firstmaharashtra.com/2026/04/08/minister-chandrakant-patils-follow-up-efforts-bear-fruit-work-on-kothruds-missing-link-gains-momentum-land-acquisition-notification-issued-for-balewadi-wakad-bridge-road-project/): पुणे: कोथरुड मतदारसंघातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. बाणेरमधील कस्पटे वस्ती परिसरातील ‘मिसिंग लिंक’च्या कामाला गती देण्यासाठी, बालेवाडी-वाकड पूल रस्ता जमीन अधिग्रहणाची अधिसूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अखेर जारी करण्यात आली आहे. कोथरुड विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रकारची वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांतदादा पाटील सातत्याने आग्रही आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळेच बुधवारी ही अधिसूचना जारी करण्यात आली असून, आता कस्पटे वस्ती येथील रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष गती मिळणार आहे. या अधिसूचनेनुसार, बाणेर-वाकड पुलासाठी बाणेर भागातील विकास योजनेतील (DP) ३० मीटर रुंदीच्या रस्त्यासाठी जमीन अधिग्रहण करण्याचे […] - [समरजितसिंह घाटगे यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश... भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले स्वागत](https://firstmaharashtra.com/2026/04/08/samarjeetsinh-ghatge-joins-the-bjp-along-with-countless-party-workers-bjp-state-president-ravindra-chavan-and-minister-chandrakant-patil-extended-a-welcome/): मुंबई : कागल येथील राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट) पक्षाचे नेते आणि शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे, त्यांचे पुत्र राजे अखिलेश सिंह, राजे विरेंद्रसिंह घाटगे, पंचायत समितीच्या सभापती सौ.सुवर्णा पाटील, उपनगराध्यक्ष जयंत रावण यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी बुधवारी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खा.धनंजय महाडिक, राजवर्धन नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रकाश आवाडे, भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी सांगितले की, समरजितसिंह घाटगे यांच्या प्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीची ताकद आणखी वाढणार आहे. […] - [पुण्यात भाजपचा 'सक्रिय कार्यकर्ता' संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न; हे संमेलन म्हणजे कार्यकर्त्यांसाठी ऊर्जेचा अक्षय स्रोत - मंत्री चंद्रकांत पाटील](https://firstmaharashtra.com/2026/04/08/bjps-active-workers-conference-concludes-with-great-enthusiasm-in-pune-this-conference-serves-as-an-inexhaustible-source-of-energy-for-party-workers-minister-chandrakant-patil/): पुणे : भारतीय जनता पार्टीच्या ४६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून, मंगळवारी पुणे शहर भाजपाच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि राष्ट्रीय सह-संघटनमंत्री शिव प्रकाश यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘सक्रिय कार्यकर्ता संमेलन’ मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या संमेलनास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. याबाबत माहिती देताना पाटील म्हणाले, आजचे हे संमेलन म्हणजे केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर माझ्यासारख्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी तो ऊर्जेचा एक अक्षय स्रोत होता. रविंद्रजी आणि शिव प्रकाशजी यांच्या मार्गदर्शनाने आम्हा सर्वांमध्ये एक नवा उत्साह संचारला आहे. ही ऊर्जा आगामी वर्षभरातील संघटनात्मक कार्यासाठी आणि पक्षवाढीसाठी निश्चितच मैलाचा दगड ठरेल, […] - [महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात एक नवे आणि क्रांतिकारी पाऊल... विद्यार्थ्यांसाठी कौशल्याधिष्ठित शिक्षणाची दारे खुली ; चार वर्षांच्या पदवीबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती](https://firstmaharashtra.com/2026/04/08/a-new-and-revolutionary-step-in-maharashtras-education-sector-doors-to-skill-based-education-opened-for-students-minister-chandrakant-patil-shares-details-regarding-the-four-year-degree-program/): मुंबई : राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP-2020) च्या प्रभावी अंमलबजावणीच्या दिशेने आपण आज एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून राज्यातील विद्यापीठांमध्ये चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमातील (Honours & Honours with Research) चौथे वर्ष लागू करण्यास आज शासन मान्यता देण्यात आली आहे. याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली. या निर्णयामुळे आपल्या विद्यार्थ्यांना संशोधनाभिमुख आणि कौशल्याधिष्ठित शिक्षणाची दारे खुली होतील. सर्व सार्वजनिक विद्यापीठे आणि स्वायत्त महाविद्यालयांमध्ये या अभ्यासक्रमाची एकसमान अंमलबजावणी व्हावी, यासाठी सविस्तर मार्गदर्शक तत्त्वेही (Guidelines) जारी करण्यात आली आहेत. या चार वर्षांच्या आराखड्यात विद्यार्थ्याला चौथ्या वर्षी संशोधनावर (Research) भर देता येईल, ज्यामुळे पदव्युत्तर शिक्षण आणि […] - [उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सावित्रीदेवी फुले छात्रालय वसतिगृहाच्या बांधकामाच्या सद्यस्थितीबाबत आढावा बैठक संपन्न](https://firstmaharashtra.com/2026/04/08/a-review-meeting-regarding-the-current-status-of-the-construction-of-the-savitridevi-phule-hostel-was-held-under-the-chairmanship-of-chandrakant-patil-minister-of-higher-and-technical-education/): मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे सावित्रीदेवी फुले छात्रालय (चर्नी रोड, मुंबई) वसतिगृहाच्या बांधकामाच्या सद्यस्थितीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत वसतिगृहाच्या बांधकामाची प्रगती, कामाची गती तसेच उर्वरित कामांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला. विद्यार्थिनींसाठी आधुनिक, सुरक्षित आणि सर्व सुविधांनी युक्त असे हे वसतिगृह उभारले जात असून, त्याचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना यावेळी मंत्री पाटील यांनी दिल्या. पावसाळ्यापूर्वीच बांधकाम पूर्ण व्हावे, यासाठी कामाची गती वाढवून आवश्यक ती सर्व यंत्रणा तात्काळ कार्यान्वित करण्याचे निर्देश पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. […] - [कर संकलन मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १८ विभागीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा करण्यात आला सन्मान](https://firstmaharashtra.com/2026/04/07/officers-and-employees-from-18-divisional-offices-who-demonstrated-outstanding-performance-in-the-tax-collection-drive-were-honored/): पिंपरी : नियोजनबद्ध कामकाज, काटेकोर अंमलबजावणी आणि वेळेवर घेतलेल्या निर्णयांमुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मालमत्ता कर संकलनात उल्लेखनीय वाढ झाली आहे,या यशामागे करसंकलन विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अविरत श्रमदान आणि जबाबदारीने केलेले काम महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व करसंकलन विभागामार्फत आर्थिक वर्ष २०२५–२६ मध्ये मालमत्ता कर संकलन मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १८ विभागीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ तसेच आगामी आर्थिक वर्ष २०२६–२७ साठी मालमत्ता कर बिल वाटप मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महिला बचत गटांना विशेष प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन निगडी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात करण्यात आले होते. यावेळी महापौर […] - [डॉ. किरण ठाकूर हे पत्रकारिता आणि सहकार क्षेत्रातील खरे 'संघर्ष योद्धा'; सांगलीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून अभिष्टचिंतन](https://firstmaharashtra.com/2026/04/07/dr-kiran-thakur-is-a-true-warrior-of-struggle-in-the-fields-of-journalism-and-the-cooperative-sector-felicitated-in-sangli-by-guardian-minister-chandrakant-patil/): सांगली : दैनिक ‘तरुण भारत’चे सल्लागार संपादक आणि लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. किरण ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सांगली येथे आयोजित सस्नेह मेळाव्यात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून त्यांचे अभिष्टचिंतन केले. यावेळी पाटील म्हणाले, किरण ठाकूर हे खऱ्या अर्थाने एक ‘संघर्ष योद्धा’ आहेत. त्यांनी पत्रकारिता आणि सहकार क्षेत्रात आपल्या कार्यातून एक वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांच्यातील ही ऊर्जेची मशाल अशीच तेवत राहो आणि त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना अशा शुभेच्छाही पाटील यांनी यावेळी दिल्या. या सस्नेह मेळाव्यास सांगलीतील विविध क्षेत्रांतील मान्यवर, पत्रकार आणि लोकमान्य सोसायटीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने […] - [भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी आपण सर्वांनी पक्ष अधिक मजबूत केला पाहिजे - मंत्री चंद्रकांत पाटील](https://firstmaharashtra.com/2026/04/07/to-propel-india-to-the-top-spot-in-the-global-economy-we-must-all-further-strengthen-the-party-minister-chandrakant-patil/): सांगली : भारतीय जनता पार्टीच्या ४६ व्या स्थापना दिनानिमित्त सांगली येथे आयोजित कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून सर्व कार्यकर्त्यांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचा यथोचित सन्मान करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी संबोधित करताना पाटील म्हणाले, आज पक्षाला ४६ वर्षे पूर्ण होत असली, तरी जनसंघाच्या काळापासून आपल्या कार्यकर्त्यांनी विचारांशी कधीही तडजोड न करता राजकीय जीवनात संघर्ष केला आहे. देशाचा राजकीय इतिहास आजच्या तरुण पिढीने आवर्जून अभ्यासला पाहिजे; कारण केवळ दोन खासदार असताना ज्या पक्षाची सर्वाधिक हेटाळणी झाली, तोच भाजपा आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली जगातील सर्वात मोठा राजकीय […] - [कोल्हापुरात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भाजप स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण](https://firstmaharashtra.com/2026/04/06/flag-hoisting-by-minister-chandrakant-patil-in-kolhapur-on-the-occasion-of-bjp-foundation-day/): कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापूर येथील आपल्या निवासस्थानी उत्साहात ध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि हितचिंतकांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना पाटील म्हणाले, गेल्या ४ दशकांहून अधिक काळ ‘राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः’ हा विचार घेऊन चालणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या राजकीय कुटुंबाचा मी एक घटक आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आणि जनसामान्यांच्या विश्वासामुळे आज भाजपा यशाची नवनवीन शिखरे सर करत आहे. हाच विश्वास सार्थ ठरवत आपण विकसित भारताच्या संकल्पासाठी कटिबद्ध राहूया, असे पाटील यांनी म्हटले. यावेळी पाटील यांनी […] - [कोथरूडच्या विकासाला अधिक गती मिळेल; नवनिर्वाचित नगरसेविका मनिषा बुटाला यांचा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार](https://firstmaharashtra.com/2026/04/06/kothruds-development-will-gain-further-momentum-newly-elected-corporator-manisha-butala-felicitated-by-minister-chandrakant-patil/): पुणे : कोथरूड येथील श्री विद्या उत्तेजक ट्रस्टच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेविका मनिषाताई बुटाला यांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमास विशेष उपस्थिती लावून मनिषाताईंचे अभिनंदन केले आणि त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “मनिषाताई बुटाला यांच्या रूपाने कोथरूडला एक अभ्यासू आणि कार्यक्षम लोकप्रतिनिधी मिळाल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून कोथरूड परिसरातील विकासकामांना अधिक गती मिळेल, असा पूर्ण विश्वास आहे.” या सत्कार समारंभाप्रसंगी डॉ. संदीप बुटाला, श्री विद्या उत्तेजक ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि कोथरूडमधील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. - [मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वाहिली दिवंगत सुप्रिया सावळेकर, मकरंद लेले आणि ओमप्रकाश रांका यांना भावपूर्ण श्रद्धांजली](https://firstmaharashtra.com/2026/04/06/minister-chandrakant-patil-paid-a-heartfelt-tribute-to-the-late-supriya-sawalekar-makarand-lele-and-omprakash-ranka/): पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे दौऱ्यादरम्यान शहरातील सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील दिवंगत व्यक्तींच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी पुष्पहार अर्पण करून मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका ॲड. मिताली सावळेकर यांच्या सासूबाई आणि भाजपा नेते कुलदीप सावळेकर यांच्या मातोश्री सुप्रिया सावळेकर यांचे नुकतेच निधन झाले. पाटील यांनी सावळेकर कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. “या कठीण प्रसंगातून सावरण्याची शक्ती ईश्वर सावळेकर कुटुंबियांना देवो,” अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मकरंद तथा दादा लेले यांच्या निधनाबद्दल पाटील यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. लेले यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी […] - [विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जपण्यासाठी 'बाटु' विद्यापीठाची परीक्षा आणि निकाल प्रक्रिया आता 'मिशन मोड'वर! - मंत्री चंद्रकांत पाटील](https://firstmaharashtra.com/2026/04/05/to-safeguard-the-academic-interests-of-students-the-examination-and-result-processes-at-batu-university-are-now-on-mission-mode-minister-chandrakant-patil/): मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणे आणि त्यांना देश-विदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी वेळेत उपलब्ध करून देणे, हे राज्य शासनाचे सर्वोच्च कर्तव्य आहे. लोणेरे (जि. रायगड) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या (DBATU) परीक्षा आणि निकाल प्रक्रियेत होणाऱ्या विलंबाबाबत विद्यार्थी, पालक आणि लोकप्रतिनिधींच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या गंभीर बाबीची दखल घेऊन, आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यापीठ प्रशासनाला कडक निर्देश दिले असून ही संपूर्ण प्रक्रिया आता ‘मिशन मोड’वर राबवून सर्व अडचणी तातडीने दूर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परीक्षांचे वेळापत्रक आणि निकाल प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करण्यासाठी एक ठोस कालबद्ध आराखडा तयार करण्याचे निर्देशही यावेळी […] - [महाराष्ट्र शासनाच्या कृतीशील धोरणामुळे क्रीडापटूंना स्थैर्य आणि सन्मान: पालकमंत्री मंत्री चंद्रकांत पाटील](https://firstmaharashtra.com/2026/04/05/stability-and-honor-for-athletes-due-to-the-proactive-policies-of-the-government-of-maharashtra-guardian-minister-chandrakant-patil/): सांगली ५ एप्रिल : क्रीडाक्षेत्र हा करिअरचा सक्षम पर्याय म्हणून सामोरा येत असून महाराष्ट्र शासनाच्या सकारात्मक व कृतिशील धोरणामुळे येथील राज्यातील क्रीडापटूंना स्थैर्य आणि सन्मान प्राप्त होत आहे. विविध क्रीडाप्रकारांत उत्तुंग कामगिरी करणाऱ्या ३७२ खेळाडूंना महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये विनापरीक्षा थेट सामावून घेण्यात आले आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले. भारतीय विद्यापीठे महासंघ (ए.आय.यू.) आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कनोईंग व कयाकिंग (पुरुष व महिला) स्पर्धांचे उद्घाटन  पाटील यांच्या हस्ते आज सकाळी येथील कै. वसंत दादा पाटील स्मृती स्मारक, कृष्णा नदीवरील रॉयल […] - [आमदार सुधीरदादा गाडगीळ यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा; सांगलीच्या विकासातील योगदानाचा गौरव](https://firstmaharashtra.com/2026/04/05/guardian-minister-chandrakant-patil-extends-birthday-wishes-to-mla-sudhirdada-gadgil-praises-his-contribution-to-sanglis-development/): सांगली : सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. सांगलीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आमदार गाडगीळ यांनी केलेले कार्य अत्यंत मोलाचे असल्याचे गौरवोद्गार यावेळी पाटील यांनी काढले. या सदिच्छा भेटीदरम्यान चंद्रकांत पाटील यांनी सुधीरदादा गाडगीळ यांना पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन केले. “सांगलीच्या विकासाचा ध्यास घेऊन दादांनी जनसामान्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यांचे नेतृत्व जिल्ह्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांना ईश्वर उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य प्रदान करो,” अशी प्रार्थना पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. या प्रसंगी सांगलीतील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध […] - [पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली सांगलीतील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या कुटुंबांची सांत्वनपर भेट](https://firstmaharashtra.com/2026/04/05/guardian-minister-chandrakant-patil-paid-a-condolence-visit-to-the-families-of-bjp-office-bearers-and-workers-in-sangli/): सांगली: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या सांगली दौऱ्यादरम्यान भाजपच्या दिवंगत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी शोकग्रस्तांना धीर देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. भारतीय जनता पार्टी, सांगलीचे माजी नगरसेवक महेश नामदेव शिंगारे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. पालकमंत्री पाटील यांनी शिंगारे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. “महेश शिंगारे यांच्या निधनाने पक्षाची मोठी हानी झाली आहे. या कठीण प्रसंगी आम्ही सर्व शिंगारे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत,” अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. भाजपचे सांगली जिल्ह्याचे माजी शहराध्यक्ष हणमंत पवार यांचे वडील रघुनाथ पवार यांचे […] - [सांगलीचे मावळते आयुक्त सत्यम गांधी यांची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली सदिच्छा भेट; कार्यकाळातील योगदानाबद्दल गौरव](https://firstmaharashtra.com/2026/04/05/guardian-minister-chandrakant-patil-paid-a-courtesy-visit-to-sanglis-outgoing-commissioner-satyam-gandhi-and-felicitated-him-for-his-contributions-during-his-tenure/): सांगली : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे मावळते आयुक्त सत्यम गांधी यांची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली. त्यांच्या कार्यकाळातील योगदानाबद्दल पाटील यांनी त्यांचे आभार मानून, पुढील उज्ज्वल वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. प्रशासकीय सेवेतील त्यांचा अनुभव आणि कार्यक्षमता आगामी काळातही जनसेवेसाठी मोलाची ठरेल, असा विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला. सत्यम गांधी यांच्या कार्यकाळात सांगली महापालिकेने उत्पन्न वाढीसाठी स्वतःचे इंधन पंप (Petrol/Diesel Pump) उभारण्याचा अभिनव प्रस्ताव मांडला. त्यांनी नुकतेच सांगली महापालिकेचे १,०६५ कोटी रुपयांचे पर्यावरणपूरक आणि पायाभूत सुविधांवर भर देणारे प्रशासकीय अंदाजपत्रक सादर केले होते. ‘माझी वसुंधरा’ अभियान, शहर स्वच्छता आणि […] - ['अंत्योदय' हाच आमच्या कार्याचा केंद्रबिंदू! - मंत्री चंद्रकांत पाटील](https://firstmaharashtra.com/2026/04/05/antyodaya-is-the-very-focal-point-of-our-work-minister-chandrakant-patil/): पुणे : भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची वैचारिक जडणघडण व्हावी, या उद्देशाने देशभरात ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. याच अभियानांतर्गत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुड मतदारसंघातील उत्तर, मध्य आणि दक्षिण मंडलाच्या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले. या सत्रात सहभागी होऊन पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी संबोधित करताना पाटील म्हणाले, हिंदू विचार हा केवळ एक ओळख नसून ती समर्पणाची शिकवण देणारी जीवनपद्धती आहे. प्रत्येकामध्ये परमेश्वर पाहणे आणि दुसऱ्याच्या आनंदात स्वतःचा आनंद मानणे, हाच या विचाराचा गाभा आहे. याच उदात्त भावनेतून, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा ‘अंत्योदयाचा’ विचार तळागाळातील सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक […] - [पुणे जिल्हा परिषद: भाजप आणि दोन्ही शिवसेना गटांच्या नवनियुक्त सदस्यांची संयुक्त बैठक; चंद्रकांत पाटील यांचे मार्गदर्शन](https://firstmaharashtra.com/2026/04/05/pune-zilla-parishad-joint-meeting-of-newly-elected-members-from-the-bjp-and-both-shiv-sena-factions-guidance-by-chandrakant-patil/): पुणे : पुणे येथे पुणे जिल्हा परिषदेतील भारतीय जनता पार्टी, शिवसेना (एकनाथजी शिंदे गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्यांची संयुक्त बैठक पार पडली. या महत्त्वपूर्ण बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून सदस्यांशी संवाद साधला. यावेळी मार्गदर्शन करताना पाटील म्हणाले, पुणे जिल्ह्याचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास हेच आपले सर्वांचे अंतिम ध्येय आहे. जिल्ह्याच्या प्रगतीसाठी आणि जनसामान्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सर्व लोकप्रतिनिधींनी समन्वयाने व एकजुटीने काम करण्यावर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीनंतरची ही पहिलीच मोठी संयुक्त बैठक होती. जिल्ह्याच्या प्रगतीसाठी एक सामायिक ध्येय ठेवून काम […] - [पुणेकरांना विनाव्यत्यय गॅस पुरवठा मिळण्यासाठी 'एमएनजीएल' प्रशासनासोबत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक!](https://firstmaharashtra.com/2026/04/05/meeting-held-with-mngl-administration-to-ensure-uninterrupted-gas-supply-for-the-residents-of-pune/): पुणे : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसच्या मागणीत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे एमएनजीएलच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न झाली. या बैठकीत कोथरुडसह संपूर्ण पुणे शहरात PNG पुरवठा विनाव्यत्यय सुरू ठेवण्याबाबत आढावा घेण्यात आला. या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी नागरिकांना तात्काळ नवीन गॅस कनेक्शन उपलब्ध करून देण्याचे आदेश. तसेच, मनुष्यबळाची कमतरता भासल्यास लोकसहभागातून १०० कर्मचारी देण्याची ग्वाही देखील यावेळी देण्यात आली. या बैठकीस एमएनजीएलचे डायरेक्टर कुमार शंकर, कमर्शियल डायरेक्टर शंकर करजगी, स्वतंत्र डायरेक्टर बागेश्री मंठाळकर, व्हाईस प्रेसिडेंट शत्रुघ्न सिंह, रितेश इंगोले, ओंकार डुबल, लोकेश सरोदे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. - [संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक मकरंद (दादा) लेले यांचे निधन; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली](https://firstmaharashtra.com/2026/04/03/senior-sangh-volunteer-makarand-dada-lele-passes-away-minister-chandrakant-patil-pays-heartfelt-tribute/): पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि माजी पुणे महानगर कार्यवाह मकरंद (दादा) लेले (७७) यांच्या निधनाने संघ परिवारासह पुण्याच्या सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. निस्वार्थ समाजसेवा आणि संघकार्याप्रती असलेली अढळ निष्ठा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य होते. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मकरंद दादांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. चंद्रकांत पाटील यांनी म्हटले, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत दीर्घकाळ सेवा बजावत असताना तसेच स्वतःचा व्यवसाय सांभाळत त्यांनी संघकार्याला आयुष्य समर्पित केले. पुणे महानगर कार्यवाह म्हणून त्यांनी मोठी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. अनेक कार्यकर्त्यांची फळी उभी करण्यासोबतच विविध सामाजिक उपक्रमांच्या उभारणीत त्यांचा मोलाचा सहभाग होता. त्यांच्या निधनाने […] - [हनुमान जयंतीनिमित्त मंत्री चंद्रकांत पाटील यांचे पाषाण नेक्लेस गार्डन येथे दर्शन; मारुतीराया चरणी सुख-समृद्धीसाठी साकडे](https://firstmaharashtra.com/2026/04/03/on-the-occasion-hanuman-jayanti-minister-chandrakant-patil-offers-prayers-at-pashan-necklace-garden-seeks-blessings-for-happiness-and-prosperity-at-the-feet-of-lord-maruti/): पुणे : हनुमान जयंतीच्या पावन पर्वावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरूड मतदारसंघातील पाषाण नेक्लेस गार्डन येथील हनुमान मंदिराला भेट देऊन मारुतीरायाचे दर्शन घेतले. बलोपासना आणि भक्तीचे प्रतीक असलेल्या हनुमंताच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांनी सर्वांच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. राज्याच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांचा आदर राखत, मंत्री पाटील यांनी हनुमान जयंतीनिमित्त आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. “हनुमंताची कृपा आणि आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव राहो,” अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी नागरिकांना दिल्या. यावेळी मंदिराच्या परिसरात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांशी आणि स्थानिक कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. हनुमान जयंतीच्या निमित्ताने पाषाण परिसरात पहाटेपासूनच भक्तीमय वातावरण होते […] - [खारवडे येथे श्री म्हसोबा उत्सवाचा उत्साह; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अर्पण केला 'बेलपत्राचा हार'](https://firstmaharashtra.com/2026/04/03/festive-fervor-at-the-shri-mhasoba-festival-in-kharavade-minister-chandrakant-patil-offers-a-garland-of-bel-leaves/): पुणे : मुळशीकरांचे परम श्रद्धास्थान असलेल्या खारवडे (जि. पुणे) येथील श्री म्हसोबा भैरवनाथ काळुबाई शंकर मंदिर ट्रस्टच्या वार्षिक उत्सवानिमित्त भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाच्या निमित्ताने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंदिराला सदिच्छा भेट देऊन श्री म्हसोबांच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे मंदिर देवस्थानने भाविकांच्या लोकसहभागातून साकारलेला भव्य ‘बेलपत्राचा हार’ होते. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हा आगळावेगळा हार श्रींच्या चरणी अर्पण करण्यात आला. यावेळी “सर्व भाविकांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभावे,” अशी प्रार्थना त्यांनी श्री म्हसोबांकडे केली. कार्यक्रमाला यावेळी कोल्हापूर करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंहभारती महाराज, ह.भ.प. राष्ट्रसंत […] - [समृद्धी महामार्गावर जालन्याजवळ भीषण अपघात; ८ जणांचा मृत्यू, मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत जाहीर](https://firstmaharashtra.com/2026/04/02/horrific-accident-on-samruddhi-expressway-near-jalna-8-dead-%e2%82%b95-lakh-aid-announced-for-kin-of-deceased/): जालना : समृद्धी महामार्गावर जालना जिल्ह्याजवळ झालेल्या एका अत्यंत भीषण अपघातात ८ निष्पाप नागरिकांनी आपला जीव गमावल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघातामुळे संपूर्ण राज्यभरात हळहळ व्यक्त केली जात असून, प्रशासकीय यंत्रणांनी तातडीने मदतकार्य राबवले आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. जालना नजीक घडलेला हा अपघात अत्यंत वेदनादायी आहे. मृत पावलेल्या नागरिकांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दांत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या अपघातातील मृतांच्या वारसांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कठीण प्रसंगी सरकार मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी […] - [कोथरुडमध्ये 'निसर्गछाया' ज्येष्ठ नागरिक महामेळावा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न; सुरांची मैफिल आणि हास्ययोगाने रंगली संध्याकाळ](https://firstmaharashtra.com/2026/04/02/the-nisargchhaya-grand-gathering-for-senior-citizens-in-kothrud-concludes-enthusiastically-in-the-presence-of-minister-chandrakant-patil-the-evening-comes-alive-with-a-musical-concert-and-laughte/): पुणे : “ज्येष्ठ नागरिक हे केवळ एका कुटुंबाचा आधार नसून, ते संपूर्ण समाजाला दिशा देणारे मार्गदर्शक आहेत. आयुष्याच्या संध्याकाळी त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, त्यांना सन्मान आणि निखळ आनंद मिळावा, यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत,” असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. कोथरुड येथे ‘निसर्गछाया’ उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या भव्य ज्येष्ठ नागरिक महामेळाव्यात ते बोलत होते. या महामेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित आणि क्रीडा समीक्षक सुनंदन लेले यांची रंगलेली विशेष मुलाखत होती. तसेच, मकरंद टिल्लू यांच्या हास्ययोग प्रात्यक्षिकांनी उपस्थितांमध्ये हास्याची कारंजी फुलवली. यानंतर ऋषिकेश रानडे, स्वरदा गोडबोले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या सुरांच्या मैफिलीने […] - [सांगलीचे नूतन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून अभिनंदन; कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या नूतन सभापतींनीही घेतली भेट](https://firstmaharashtra.com/2026/04/01/sanglis-newly-appointed-district-collector-dr-mainak-ghosh-congratulated-by-minister-chandrakant-patil-the-new-chairperson-of-the-kolhapur-zilla-parishad-also-paid-a-visit/): कोल्हापूर : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीचे नूतन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन केले. डॉ. घोष यांची नुकतीच सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली असून, मंत्री पाटील यांनी त्यांना पुढील यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. दुसरीकडे, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अर्थ व शिक्षण सभापती म्हणून जनसुराज्य शक्ती पक्षाच्या सौ. शीतल यादव यांची निवड झाली आहे. निवड झाल्यानंतर सौ. यादव यांनी कोल्हापूर येथे मंत्री चंद्रकांत पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मंत्री महोदयांनी सौ. शीतल यादव यांचे अभिनंदन करून त्यांना शिक्षण व अर्थ विभागाच्या माध्यमातून ग्रामीण विकासासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी […] - [कणेरी मठात 'सिद्धगिरी कारागीर महाकुंभ'चा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शानदार शुभारंभ](https://firstmaharashtra.com/2026/04/01/grand-inauguration-of-the-siddhagiri-karagir-mahakumbh-at-kaneri-math-graced-by-the-presence-of-minister-chandrakant-patil/): कोल्हापूर : भारतीय संस्कृतीतील बारा बलुतेदारांच्या समृद्ध वारशाचे जतन करण्यासाठी आणि स्थानिक कलाकारांना जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी कणेरी येथील श्री सिद्धगिरी संस्थान मठ आणि पर्यटन मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सिद्धगिरी कारागीर महाकुंभ’ चे आयोजन करण्यात आले आहे. प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या पावन उपस्थितीत आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन संपन्न झाले. यावेळी संबोधित करताना पाटील म्हणाले, बारा बलुतेदारांच्या समृद्ध वारशाचे जतन आणि स्थानिक कलाकारांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा एक अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. ३१ मार्च ते ४ एप्रिल २०२६ या काळात चालणाऱ्या या महोत्सवात १७ राज्यांतील २०० हून अधिक राष्ट्रीय-राज्य […] - [मिरा-भाईंदरमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांची भाजप जिल्हा कार्यालयास भेट; पक्षीय कामाचा आढावा घेत कार्यकर्त्यांशी साधला संवाद](https://firstmaharashtra.com/2026/03/31/minister-chandrakant-patil-visits-the-bjp-district-office-in-mira-bhayandar-reviews-party-activities-and-interacts-with-party-workers/): मुंबई : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या मिरा-भाईंदर दौऱ्यादरम्यान भारतीय जनता पार्टीच्या शहर जिल्हा कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि पक्षविस्ताराच्या दृष्टीने जिल्हा पातळीवरील कामाचा सविस्तर आढावा घेतला. उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मंत्री पाटील म्हणाले की, आपल्या सर्वांच्या निष्ठेमुळे आणि अथक परिश्रमांमुळे भारतीय जनता पार्टीची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचत आहे, याचा आनंद वाटला. कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेत, त्यांनी मांडलेल्या सूचनांची दखल घेण्याचे आश्वासनहीपाटील यांनी दिले. या प्रसंगी आमदार नरेंद्र मेहता, महापौर डिंपल मेहता, भाजपा जिल्हा अध्यक्ष दिलीप जैन, भाजपा जिल्हा महिला अध्यक्षा वैशाली भोईर, जिल्हा भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष रणवीर बाजपेयी, जिल्हा महामंत्री ज्ञानेंन्द्र […] - [मुंबईत 'फ्युएल' (FUEL) संस्थेचा एनएसई-सोशल स्टॉक एक्स्चेंजवर गौरव; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत रंगला 'बेल रिंगिंग' सोहळा](https://firstmaharashtra.com/2026/03/31/mumbai-fuel-organization-honored-on-the-nse-social-stock-exchange-bell-ringing-ceremony-held-in-the-presence-of-minister-chandrakant-patil/): मुंबई : सामाजिक क्षेत्रात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलत, ‘फ्रेंड्स युनियन फॉर एनर्जायझिंग लाइव्ह्स’ (FUEL) या संस्थेचा नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) च्या सोशल स्टॉक एक्स्चेंज (SSE) वर नोंदणी सोहळा (Bell Ringing Ceremony) दिमाखात पार पडला. महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या विशेष कार्यक्रमाला उपस्थित राहून ‘बेल’ वाजवून या नवीन प्रवासाचे स्वागत केले. याबाबत माहिती देताना पाटील म्हणाले, या उपक्रमांतर्गत ९८.२९ लाख रुपयांचा निधी उभारण्यात आला आहे, ज्याचा विनियोग ४० गरजू आणि आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी केला जाणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आणि AICTE मान्यताप्राप्त BBA अभ्यासक्रमाद्वारे या विद्यार्थिनींना केवळ दर्जेदार शिक्षणच […] - [शिक्षण आणि संस्कारांचा नवा अध्याय: एमआयटी ठाणे संकुलाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न](https://firstmaharashtra.com/2026/03/31/a-new-chapter-in-education-and-values-mit-thane-campus-inaugurated-by-minister-for-higher-and-technical-education-chandrakant-patil/): मुंबई : शिक्षण क्षेत्रात ४३ वर्षांहून अधिक काळ ‘ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार’ ही त्रिसूत्री जपणा-या एमआयटी (MIT) पुणे या अग्रगण्य संस्थेच्या ठाण्यातील ‘MAEER’s MIT’ या नूतन शैक्षणिक संकुलाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोमवारी ३० मार्च २६ रोजी मोठ्या उत्साहात उद्घाटन संपन्न झाले. यावेळी पाटील यांनी म्हटले, मुंबई आणि ठाणे परिसरातील विद्यार्थ्यांसाठी हे संकुल आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाचे एक नवे केंद्र ठरेल. तंत्रज्ञान आणि संस्कृतीचा मेळ घालत, इथून जागतिक दर्जाचे अभियंते आणि जबाबदार नागरिक घडावेत, अशी सदिच्छा पाटील यांनी व्यक्त केली. तसेच एमआयटी परिवाराचे अभिनंदन आणि भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देखील दिल्या. यावेळी […] - [केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांचे मेहुणे ब्रिगेडियर डॉ. एन. के. शर्मा यांचे निधन; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वाहिली श्रद्धांजली](https://firstmaharashtra.com/2026/03/30/union-minister-j-p-naddas-brother-in-law-brigadier-dr-n-k-sharma-passes-away-minister-chandrakant-patil-pays-tribute/): पुणे : भारतीय लष्करातील निवृत्त अधिकारी आणि प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ ब्रिगेडियर डॉ. एन. के. शर्मा यांचे पुण्यात निधन झाले. ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांचे मेहुणे होते. त्यांच्या निधनामुळे शर्मा आणि नड्डा परिवारावर शोककळा पसरली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी पुणे येथील डॉ. शर्मा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी पाटील यांनी जे. पी. नड्डाजी आणि शर्मा कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. “या कठीण प्रसंगी आम्ही सर्वजण नड्डा आणि शर्मा परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत,” अशा भावना मंत्री पाटील यांनी व्यक्त केल्या. डॉ. शर्मा यांनी भारतीय लष्करामध्ये ब्रिगेडियर […] - [सांस्कृतिक संवर्धन आणि विकासाचा नवा आयाम: आमचा संकल्प! - मंत्री चंद्रकांत पाटील](https://firstmaharashtra.com/2026/03/30/a-new-dimension-of-cultural-preservation-and-development-our-pledge-minister-chandrakant-patil/): पुणे : भारतीय संस्कृती हाच आपला खरा वारसा असून, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या ‘विरासत ते विकास’ या मंत्रानुसार महाराष्ट्र सरकार सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. पुण्यात आयोजित ‘पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवा’ च्या निमित्ताने कोथरुड येथे ७५० हून अधिक नृत्यांगनांनी ‘वंदे मातरम्’च्या १५० व्या वर्षानिमित्त सादर केलेला सामूहिक कलाविष्कार हा पुण्याच्या सांस्कृतिक इतिहासातील एक सुवर्णक्षण ठरला.यावेळी मंत्री आशिष शेलार यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संबोधित करताना पाटील म्हणाले, पंडिता रोहिणीताई भाटे यांनी कथ्थक साधनेसाठी दिलेले योगदान पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सांस्कृतिक […] - [पुण्यात 'गीतरामायणा'चा भक्तिमय सोहळा; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला सुरावलींचा आनंद](https://firstmaharashtra.com/2026/03/29/a-devotional-celebration-of-geet-ramayan-in-pune-minister-chandrakant-patil-delights-in-the-melodies/): पुणे : ​’स्वये श्रीरामानं नमुनी, गदिमांनी रचिलेले आणि बाबूजींनी (सुधीर फडके) आपल्या सुरावलींनी अजरामर केलेले ‘गीतरामायण’ म्हणजे मराठी संस्कृतीतील एक दैवी लेणे आहे. रामनवमीच्या या पवित्र पर्वावर, आज बाबूजींचे सुपुत्र श्री. श्रीधरजी फडके यांच्या ‘गीतरामायण’ कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून या सुमधुर काव्याचा आनंद घेतला. ​ यावेळी पाटील म्हणाले, गदिमांचे शब्द आणि बाबूजींचे संगीत यांनी सजलेली ही रामकथा ऐकताना मन प्रसन्न झाले. पिढ्यानपिढ्या मराठी मनावर संस्कार करणाऱ्या या रचनेतील प्रत्येक शब्द आजही तितकाच ताजा आणि भक्तीमय वाटतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रभू श्रीरामाच्या जीवनप्रवासाचे स्मरण झाले आणि पुन्हा एकदा त्या सुवर्णकाळाचा अनुभव घेता आला. ​श्रीधरजींनी […] - [पुण्यात 'नृत्य महोत्सवा'चा दिमाखदार सोहळा; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन](https://firstmaharashtra.com/2026/03/29/grand-celebration-of-dance-festival-in-pune-inaugurated-by-minister-chandrakant-patil/): पुणे :पुण्याच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेत मानाचा तुरा रोवणाऱ्या आणि थोर नृत्यगुरू पं. रोहिणी भाटे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘नृत्य महोत्सवा’चे यंदा चौथे वर्ष मोठ्या उत्साहात साजरे होत आहे. महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, युवा सुराज्य प्रतिष्ठान आणि शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या दोन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या मंगलमयी सोहळ्याचे शानदार उद्घाटन करण्यात आले. यावेळी संबोधित करताना पाटील म्हणाले, ​खरं तर, तीन वर्षांपूर्वी जेव्हा या महोत्सवाची संकल्पना मांडण्यात आली, तेव्हा तो इतका लोकप्रिय आणि भव्य होईल याची कल्पना नव्हती. मात्र, रसिकांचा अलोट […] - [इतिहासतज्ज्ञ डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट](https://firstmaharashtra.com/2026/03/28/historian-dr-jaysingrao-pawar-passes-away-minister-chandrakant-patil-pays-a-consoling-visit-to-his-family/): कोल्हापूर : शिव-शाहू विचारांचे गाढे अभ्यासक आणि महाराष्ट्राच्या जाज्वल्य इतिहासाचे संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनाने इतिहास संशोधनाच्या क्षेत्रातील एक देदीप्यमान पर्व संपुष्टात आले आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठी शोककळा पसरली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी कोल्हापूर येथे डॉ. पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी त्यांनी पवार परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. डॉ. पवार यांच्या निधनाने आपण एक मार्गदर्शक आणि शिव-शाहू विचारांचा खंदा पुरस्कर्ता गमावला असल्याची भावना मंत्री पाटील यांनी व्यक्त केली. पाटील यांनी म्हटले कि, सरांशी असलेले माझे ऋणानुबंध जुने होते. इतिहासातील अनेक गुंतागुंतीचे विषय […] - [सांगलीत 'जनप्रवास' तर्फे कर्तृत्ववान महिलांचा 'रणरागिणी गौरव'; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान](https://firstmaharashtra.com/2026/03/28/ranragini-gaurav-an-honor-for-accomplished-women-organized-by-janpravas-in-sangli-awards-presented-by-minister-chandrakant-patil/): सांगली : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दैनिक ‘जनप्रवास’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘रणरागिणी गौरव २०२६’ सोहळ्यात समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला. महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या गुणवंत महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान हा प्रेरणादायी असून महिला सक्षमीकरणासाठी अशा उपक्रमांचे मोठे महत्त्व आहे, असे मत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर भर दिला. सांगली जिल्ह्यात जिल्हा वार्षिक योजनेतून ९०० महिलांना उद्योजकता प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. येत्या जूनपासून शाळा […] - [ऑनलाईन प्लॅटफॉर्मसह खरेदीदार विक्रेता मेळावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न](https://firstmaharashtra.com/2026/03/28/a-buyer-seller-meet-featuring-online-platforms-was-successfully-concluded-amidst-great-enthusiasm-in-the-presence-of-guardian-minister-chandrakant-patil/): सांगली : सांगली जिल्ह्यातील कृषि क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी मित्रा कंपनी व सांगली जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतमालाच्या ई मार्केटिंगसाठी कार्यवाही सुरू आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील कृषि उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळून सांगलीतील शेतमाल थेट देशभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग खुला झाला आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. ऑनलाईन प्लॅटफॉर्मसह खरेदीदार विक्रेता मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजित या मेळाव्यास जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, आत्माचे प्रकल्प संचालक अभयकुमार चव्हाण, अपेडाचे अध्यक्ष डॉ. परशराम पाटील, फ्लिपकार्टचे अधिकारी […] - [आधुनिक व दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध - पालकमंत्री चंद्रकांत पाटील](https://firstmaharashtra.com/2026/03/28/the-government-is-committed-to-providing-modern-and-high-quality-sports-facilities-guardian-minister-chandrakant-patil/): सांगली : युवा खेळाडुंच्या भवितव्यासाठी जिल्ह्यात क्रीडापूरक वातावरण निर्माण करून आधुनिक व दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. बॅडमिंटन कोर्टाच्या नूतनीकरणातून नव्या खेळाडुंना अधिक संधी निर्माण होतील, असा विश्वास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे व्यक्त केला. जिल्हा क्रीडा संकुल, सांगली येथील नूतनीकरण केलेल्या बॅडमिंटन हॉलच्या उद्घाटन व लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदि उपस्थित होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, कोविड -19 च्या महामारीच्या काळामध्ये बॅडमिंटन […] - [हुंडा प्रतिबंधक कायद्याची माहिती देणाऱ्या घडी पुस्तिकेचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रकाशन](https://firstmaharashtra.com/2026/03/28/guardian-minister-chandrakant-patil-releases-a-brochure-providing-information-on-the-dowry-prohibition-act/): सांगली : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाकडून हुंडा प्रतिबंधक कायदा, १९६१ (Dowry Prohibition Act, 1961 बाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती होणेसाठी तयार करण्यात आलेल्या घडीपुस्तिकेचे अनावरण राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात या घडीपुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी वर्षा पाटील आदि उपस्थित होते. हुंडा घ्यायचा नाही व हुंडा द्यायचा नाही हा विचार समाजात रुजवण्यासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून सांगली पॅटर्न हुंडामुक्ती अभियान – टप्पा १ राबविण्यात आले. […] - [सामान्य नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी प्रयत्नरत - पालकमंत्री चंद्रकांत पाटील](https://firstmaharashtra.com/2026/03/28/committed-to-providing-quality-healthcare-to-common-citizens-guardian-minister-chandrakant-patil/): सांगली : शासकीय रूग्णालयात अत्याधुनिक साधन सामग्री व मनुष्यबळ देऊन आरोग्यसेवा अद्ययावत करण्यात येत आहेत. गोर गरीब, सामान्य नागरिकांना मोफत किंवा माफक दरात चांगल्या वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन व जिल्हा वार्षिक योजनेतून निधीची कमतरता भासू देणार नाही. शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या चमुनेही मिशन मोडवर काम करून लोकांना आरोग्याची चांगली सेवा द्यावी, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 च्या निधीतून मंजूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथील अत्याधुनिक बर्न आयसीयु, सोनोग्राफी मशीन व अत्याधुनिक शवविच्छेदन विभाग या कामाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत […] - [पोलीस दलाच्या बळकटीकरणासाठी भरीव निधी देऊ - पालकमंत्री चंद्रकांत पाटील](https://firstmaharashtra.com/2026/03/27/we-will-provide-substantial-funds-to-strengthen-the-police-force-guardian-minister-chandrakant-patil/): सांगली  : पोलीस दलाच्या सात कामांसाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) मधून ४ कोटी ३४ लाख १६ हजार १९३ रूपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. यापुढेही पोलीस दलाच्या बळकटीकरणासाठी भरीव निधी वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२५-२६ च्या निधीतून मंजूर सांगली जिल्हा पोलीस दलाकडील विविध विकासकामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित या कार्यक्रमास आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, पोलीस अधीक्षक […] - [मोदी सरकारचा मोठा दिलासा: पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोठी कपात; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मानले आभार](https://firstmaharashtra.com/2026/03/27/major-relief-from-the-modi-government-significant-cut-in-excise-duty-on-petrol-and-diesel-minister-chandrakant-patil-expresses-gratitude/): नवी दिल्ली : जागतिक स्तरावर इंधनाचे दर गगनाला भिडले असताना, केंद्र सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क १३ रुपयांवरून ३ रुपयांपर्यंत, तर डिझेलवरील शुल्कात १० रुपयांची कपात करण्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतला आहे. या निर्णयाचे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वागत करत पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. सध्या आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरात पेट्रोलियम पदार्थांच्या किमती नियंत्रणाबाहेर गेल्या आहेत. आफ्रिका आणि आशियाच्या नैऋत्य भागात इंधन ५० टक्क्यांनी महागले असून, उत्तर अमेरिका (३०%) आणि युरोपातही (२०%) मोठी दरवाढ झाली आहे. अशा कठीण परिस्थितीत भारतीय नागरिकांना महागाईची झळ बसू नये, […] - [सकल हिंदू समाज व हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या भव्य संमेलनात मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सहभाग; एकात्मता आणि संस्कृती जतनाचे आवाहन](https://firstmaharashtra.com/2026/03/27/minister-chandrakant-patil-participates-in-grand-gathering-organized-by-the-sakal-hindu-samaj-and-the-hindu-new-year-welcome-committee-calls-for-unity-and-cultural-preservation/): पुणे : भारतीय संस्कृतीचे जतन आणि समाजातील एकात्मता अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने पुण्यात ‘सकल हिंदू समाज’ व ‘हिंदू नववर्ष स्वागत समिती’च्या वतीने भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून समाजातील विविध घटकांशी संवाद साधला. याप्रसंगी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी भारतीय संस्कृतीतील उदात्त विचारांचा उल्लेख केला. ते म्हणाले, “आपली संस्कृती ‘सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः’ या भावनेवर आधारित आहे. ही प्रार्थना केवळ एका वर्गासाठी नसून सर्वांच्या कल्याणाची सार्वत्रिक भावना व्यक्त करते. अशा संमेलनांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक विचार आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचे कार्य होत आहे, ही अत्यंत अभिमानास्पद […] - [कोथरूड आणि तुळशीबाग राम मंदिरात रामजन्मोत्सवाचा जल्लोष; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले प्रभू श्रीरामांचे दर्शन](https://firstmaharashtra.com/2026/03/26/jubilant-celebrations-mark-ram-janmotsav-at-the-ram-temples-in-kothrud-and-tulshibaug-minister-chandrakant-patil-offers-prayers-to-lord-shri-ram/): पुणे  : प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मोत्सवाचा उत्साह संपूर्ण पुणे शहरात पाहायला मिळाला. कोथरूड परिसरातील विविध मंडळांनी आयोजित केलेल्या राम जन्मोत्सव सोहळ्यांमध्ये राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्यक्ष सहभागी होत भाविकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांना रामनवमीच्या मंगलमयी शुभेच्छा दिल्या. कोथरूडमधील कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “प्रभू श्रीरामांचे जीवन हे आदर्श, नैतिकता आणि कर्तव्यभावनेचे प्रतीक आहे. त्यांच्या या महान आदर्शांनी प्रेरित होऊन समाजात सद्भावना आणि मूल्ये अधिक वृद्धिंगत व्हावीत, हीच प्रभू चरणी प्रार्थना आहे. कोथरूड येथील सोहळ्यानंतर, चंद्रकांत पाटील यांनी पुणेकरांचे मुख्य श्रद्धास्थान असलेल्या तुळशीबाग येथील ऐतिहासिक राम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी प्रभू रामरायाची […] - [तत्वनिष्ठ, व्यासंगी आणि इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार सरांचे निधन ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि वैचारिक क्षेत्राची मोठी हानी - मंत्री चंद्रकांत पाटील](https://firstmaharashtra.com/2026/03/26/the-passing-of-the-principled-erudite-scholar-and-historical-researcher-dr-jaisingrao-pawar-marks-a-profound-loss-for-maharashtras-cultural-and-intellectual-spheres-minister-chandrakan/): कोल्हापूर, २६ मार्च : मराठेशाहीचा देदीप्यमान इतिहास पुराव्यांसह जगासमोर मांडणारे उत्तुंग व्यक्तिमत्व, राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे खंदे पुरस्कर्ते, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे गुरुवारी पहाटे वयाच्या ८५ व्या वर्षी कोल्हापुरात निधन झाले. त्यांच्या जाण्याने शिव-शाहू विचारांचा एक निष्ठावंत अभ्यासक हरपला असल्याची प्रतिक्रिया उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. डॉ. जयसिंगराव पवार यांच्याप्रती दुःख व्यक्त करताना पाटील म्हणाले, गेल्या काही दिवसापासून आजारपणामुळे कोल्हापूरातील रुग्णालयात भरती असलेल्या डॉ. जयसिंगराव पवार यांची रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली होती. त्यांच्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाच्या मार्गदर्शनाची आजच्या तरुण पिढीला मोठी गरज असतानाच ते आज आपल्यातून निघून गेले आहेत. राजर्षी […] - [संपूर्ण अधिवेशन कालावधीत महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सभागृहात सकारात्मक चर्चा - मंत्री चंद्रकांत पाटील](https://firstmaharashtra.com/2026/03/25/positive-discussions-held-in-the-house-throughout-the-entire-session-regarding-the-holistic-development-of-maharashtra-minister-chandrakant-patil/): मुंबई  : महाराष्ट्र विधानमंडळाचे सन २०२६ चे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज दि. २५ मार्च, २०२६ रोजी यशस्वीरित्या संपन्न झाले. अधिवेशनाचे कामकाज संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विधान भवन, मुंबई येथे चहापानाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्रिमंडळातील सर्व सहकारी मंत्री आणि दोन्ही सभागृहांचे सन्माननीय आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संपूर्ण अधिवेशन कालावधीत महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सभागृहात सकारात्मक चर्चा झाली असल्याचे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. लोकशाहीच्या या पवित्र मंदिरात जनहिताचे प्रश्न मांडताना जे निकोप वातावरण पाहायला मिळाले, ते यापुढे […] - [महाराष्ट्रातील तंत्रशिक्षण संस्था आता होणार 'ऊर्जा स्वयंपूर्ण'! - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील](https://firstmaharashtra.com/2026/03/25/technical-education-institutes-in-maharashtra-to-become-energy-self-sufficient-higher-and-technical-education-minister-chandrakant-patil/): मुंबई : राज्यातील तंत्रशिक्षण क्षेत्रासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि आश्वासक निर्णय आज घेण्यात आला. राज्यातील शासकीय अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालये आणि तंत्रनिकेतनांमध्ये हरित ऊर्जेचा (Green Energy) वापर वाढवण्यासाठी आज तंत्रशिक्षण संचालनालय आणि MAHAPREIT यांच्यात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार (MoU) संपन्न झाला. याबाबत माहिती देताना पाटील म्हणाले, या उपक्रमामागचा आमचा मुख्य उद्देश शैक्षणिक संस्थांमधील वीज खर्चात बचत करणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे हा आहे. हा प्रकल्प RESCO मॉडेलवर आधारित असल्याने राज्य शासनावर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही. संस्थांच्या इमारतींवर सौरऊर्जा संयंत्रे, स्मार्ट ग्रिड, ऊर्जा साठवणूक (Energy Storage) आणि ऊर्जा कार्यक्षम प्रणाली कार्यान्वित केल्या […] - [लोकमत साहित्य पुरस्कार २०२६ : साहित्यिकांसाठी मोठी घोषणा; पुरस्कारप्राप्त पुस्तकांच्या ५०० प्रती सरकार विकत घेणार - मंत्री चंद्रकांत पाटील](https://firstmaharashtra.com/2026/03/25/lokmat-literary-awards-2026-major-announcement-for-writers-government-to-purchase-500-copies-of-award-winning-books-minister-chandrakant-patil/): ठाणे : ठाणे येथील ऐतिहासिक गडकरी रंगायतन नाट्यगृहात मंगळवार, २४ मार्च २०२६ रोजी ‘दैनिक लोकमत साहित्य पुरस्कार २०२६’ वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. ​राजहंस प्रकाशनचे ज्येष्ठ प्रकाशक दिलीप माजगावकर यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. सुमारे ८५० हून अधिक दर्जेदार पुस्तके प्रकाशित करून त्यांनी मराठी साहित्य विश्व समृद्ध केले आहे, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद बाब असल्याचे पाटील यांनी म्हटले. तसेच उत्कृष्ट साहित्यनिर्मितीसाठी निवड झालेल्या ११ लेखकांचे व कवींचे देखील पाटील यांनी अभिनंदन केले. यावेळी संबोधित करताना पाटील म्हणाले, ​वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी आणि ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन ‘गाव तिथे […] - [कोंढापुरी 'के.ई.एम.' रुग्णालयाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा; शासनाकडून जमीन हस्तांतरित, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मानले आभार](https://firstmaharashtra.com/2026/03/24/path-cleared-for-expansion-of-kem-hospital-in-kondhapuri-government-transfers-land-minister-chandrakant-patil-expresses-gratitude/): पुणे : पुणे जिल्ह्यातील कोंढापुरी आणि परिसरातील ग्रामीण नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. कोंढापुरी येथील ‘के.ई.एम. रुग्णालय’ विस्तारासाठी ०.८१ आर जमीन हस्तांतरित करण्यास शासनाने मंजुरी दिली असून, यामुळे या भागातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ही जमीन विशेष बाब म्हणून ‘महसूलमुक्त’ आणि ‘भोगवटामूल्यरहित’ पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील शेवटच्या माणसाला वेळेवर आणि उत्तम उपचार मिळावेत, या उद्देशाने हा जनहितैषी निर्णय घेण्यात आला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री आणि महायुती सरकारचे मन:पूर्वक आभार मानले आहेत. आरोग्यसंपन्न […] - [माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी - मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वाहिली श्रद्धांजली](https://firstmaharashtra.com/2026/03/23/former-minister-datta-meghe-passes-away-leaves-a-major-void-in-political-educational-and-social-spheres-minister-chandrakant-patil-pays-tribute/): पुणे :राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांच्या निधनाबद्दल राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मेघे यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्राची मोठी पोकळी निर्माण झाली असून एक विकासाभिमुख नेतृत्व हरपल्याची भावना पाटील यांनी व्यक्त केली. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या शोकसंदेशात दत्ता मेघे यांच्या कार्याचा गौरव केला. अमरावती जिल्ह्यातून सार्वजनिक जीवनाची सुरुवात करत त्यांनी आमदार, खासदार तसेच राज्य मंत्रिमंडळात विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या. शिक्षण क्षेत्राच्या उभारणीत त्यांचे विशेष योगदान असून अनेक शैक्षणिक संस्था स्थापन करून त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची दारे खुली केली. समाजकारण आणि […] - [मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजप पदाधिकारी व नगरसेवकांचा सस्नेह मेळावा; हिंदू नववर्षाच्या दिल्या शुभेच्छा](https://firstmaharashtra.com/2026/03/23/a-cordial-gathering-of-bjp-office-bearers-and-corporators-was-held-in-the-presence-of-minister-chandrakant-patil-where-greetings-for-the-hindu-new-year-were-extended/): पुणे : गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या शुभमुहूर्तावर कोथरूड मतदारसंघाचे आमदार आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी कोथरूड मंडलाचा सस्नेह मेळावा उत्साहात पार पडला. पुण्यातील ‘निसर्ग छाया’ येथे आयोजित या कार्यक्रमात भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि माजी नगरसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मंत्री पाटील यांनी उपस्थित सर्वांना हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच, आगामी काळात जनसेवेसाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. वस्ती पातळीवरील कार्यकर्त्यांपासून ते वरिष्ठ नेत्यांपर्यंत सर्वांच्या सहभागामुळे कोथरूड भाजपमध्ये नवचैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले. पक्ष संघटनेला अधिक बळकट करण्यासाठी पाटील यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. आगामी निवडणुका आणि […] - [मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नवनिर्वाचित उमेदवारांची घेतली भेट; पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा](https://firstmaharashtra.com/2026/03/23/minister-chandrakant-patil-met-with-the-newly-elected-members-of-the-maharashtra-sahitya-parishad-and-extended-his-best-wishes-for-their-future-endeavors/): मुंबई :विधान भवन, मुंबई येथे आज राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप) च्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘साहित्य संवर्धन आघाडी’च्या पॅनेल मधून विजयी झालेल्या नवनिर्वाचित उमेदवारांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी सर्व विजयी उमेदवारांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, कार्यवाह स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर तसेच सुनील महाजन, नितिन संगमनेरकर, संजय चाकणे, कुणाल ओंबासे, प्रसाद मिरासदार आणि सौ. सुनेत्रा मंकणी या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. “साहित्य संवर्धनासाठी आपल्या कार्याला नवी दिशा मिळो आणि मराठी साहित्यविश्व अधिक समृद्ध […] - [पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ऐतिहासिक विक्रम; सर्वाधिक काळ सत्तेत राहणारे भारतीय नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून अभिनंदन](https://firstmaharashtra.com/2026/03/22/prime-minister-narendra-modi-sets-historic-record-longest-serving-indian-leader-minister-chandrakant-patil-extends-congratulations/): पुणे : भारतीय लोकशाहीच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान असा एकूण ८,९३१ दिवसांचा कार्यकाळ पूर्ण करून, भारतातील सर्वाधिक काळ सत्तेत राहणारे नेते होण्याचा ऐतिहासिक बहुमान मिळवला आहे. या अभूतपूर्व कामगिरीबद्दल राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करत गौरवोद्गार काढले आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या संदेशात म्हटले की, गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून प्रदीर्घ काळ केलेली जनसेवा असो किंवा भारताचे पंतप्रधान म्हणून देशाला ‘विश्वगुरू’ बनवण्यासाठी घेतलेले अहोरात्र कष्ट असो; मोदीजींच्या नेतृत्वाखालील या प्रवासाने प्रत्येक भारतीयाचे जीवन समृद्ध केले आहे. ८,९३१ दिवसांचा कार्यकाळ पूर्ण करून त्यांनी प्रदीर्घ […] - [पुण्यात ‘गौ-टेक २०२६’ एक्स्पोचा उत्साह; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली भेट, ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यावर भर](https://firstmaharashtra.com/2026/03/22/excitement-surrounds-gau-tech-2026-expo-in-pune-minister-chandrakant-patil-pays-a-visit-emphasizing-the-strengthening-of-the-rural-economy/): पुणे : पुण्यातील कृषी महाविद्यालय मैदान येथे आयोजित गौ-टेक (Gau Tech) २०२६ एक्स्पोला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. देशी गोवंश संवर्धन, सेंद्रिय शेती, पंचगव्य आणि गो-आधारित उद्योगांना चालना देणाऱ्या विविध उपक्रमांची त्यांनी यावेळी माहिती घेतली. यावेळी पाटील यांनी म्हटले, ‘गौ ज्ञान – विज्ञानापासून वैश्विक व्यवसायापर्यंत’ या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम आत्मनिर्भर भारताच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असून, गाईंच्या वैज्ञानिक वापरातून ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. असे उपक्रम राज्याच्या इतरही भागात राबवले जाणे आवश्यक आहे, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. २० मार्च ते २३ मार्च २०२६ या कालावधीत, दररोज सकाळी १०:०० ते […] - [माजी खासदार प्रदीप रावत यांच्या मातोश्रींचे निधन; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वाहिली श्रद्धांजली](https://firstmaharashtra.com/2026/03/22/former-mp-pradeep-rawats-mother-passes-away-minister-chandrakant-patil-pays-tribute/): पुणे : पुणे लोकसभेचे माजी खासदार प्रदीपदादा रावत यांच्या मातोश्रींचे नुकतेच निधन झाले. या दुःखद बातमीची दखल घेत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रावत यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. मंत्री पाटील यांनी दिवंगत मातोश्रींच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी रावत परिवाराशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. प्रदीपदादा आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराच्या या कठीण काळात आम्ही सर्वजण त्यांच्या दुःखात सहभागी आहोत, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. ईश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो आणि रावत परिवाराला या मोठ्या धक्क्यातून सावरण्याचे बळ देवो, अशी प्रार्थनाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली. - [कोथरूडमधील 'मानसी' प्रकल्पाचा विस्तार; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते माहितीपुस्तिका व संकेतस्थळाचे लोकार्पण](https://firstmaharashtra.com/2026/03/22/expansion-of-the-manasi-project-in-kothrud-launch-of-brochure-and-website-by-minister-chandrakant-patil/): पुणे : कोथरूडमधील वस्तीभागातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या पंखांना बळ देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मानसी’ प्रकल्पाचा आता विस्तार झाला आहे. या प्रेरणादायी उपक्रमाच्या माहितीपुस्तिकेचे प्रकाशन आणि संकेतस्थळाचे (Website) लोकार्पण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. एका छोट्या रोपट्यापासून सुरू झालेल्या या उपक्रमाचा आज वटवृक्ष होताना पाहून मनस्वी आनंद होत आहे, अशा भावना मंत्री पाटील यांनी यावेळी व्यक्त केल्या. याच प्रसंगी ‘मानसी-प्रेरणा फाऊंडेशन’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदी मुग्धा भागवत यांची निवड करण्यात आली. चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रकल्पाची यशोगाथा आता माहितीपुस्तिकेसह संकेतस्थळाच्या माध्यमातून जगासमोर येणार आहे, ज्यामुळे अधिक […] - [मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. जयसिंगराव पवार यांची भेट; तब्येतीची केली विचारपूस](https://firstmaharashtra.com/2026/03/21/minister-chandrakant-patil-met-with-veteran-historian-dr-jaysingrao-pawar-and-inquired-about-his-health/): कोल्हापूर : ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ, विचारवंत आणि राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे खंदे पुरस्कर्ते डॉ. जयसिंगराव पवार यांची प्रकृती काहीशी अस्वस्थ असल्यामुळे शुक्रवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. चंद्रकांत पाटील यांनी म्हटले, डॉ. पवार सरांनी आपले संपूर्ण आयुष्य महाराष्ट्राचा इतिहास आणि विशेषतः शिव-शाहू विचारांच्या संशोधनासाठी समर्पित केले आहे. त्यांनी लिहिलेले ‘राजर्षी शाहू छत्रपती’ हे चरित्र केवळ एक पुस्तक नसून, सामाजिक समतेचा इतिहास मांडणारा एक अनमोल दस्तऐवज आहे. ‘क्रांतिसिंह नाना पाटील’, ‘छत्रपती संभाजी महाराज’ आणि ‘मराठी सत्तेचा उदय’ यांसारख्या त्यांच्या अनेक ग्रंथांनी इतिहास संशोधनाला नवी दिशा दिली आहे. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात ‘शाहू […] - [स्त्रीशक्तीच्या कर्तृत्वाला बळ; सांगलीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न](https://firstmaharashtra.com/2026/03/21/empowering-womens-achievements-womens-entrepreneurship-development-training-program-concludes-in-sangli-presided-over-by-guardian-minister-chandrakant-patil/): सांगली : महिला शिकली तर सक्षम होईल. महिला सक्षम असेल तर सर्व कुटुंब सक्षम होईल आणि कुटुंब सक्षम असेल तर देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल. त्यामुळे महिला उद्योजकता विकास प्रशिक्षणातून महिलांना सक्षम करण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले. महिला उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. खरे मंगल कार्यालय येथे आयोजित या कार्यक्रमास जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी वर्षा पाटील, उद्योग अधिकारी टी. एन खांडेकर, महिला उद्योजकता विकास केंद्राचे आलोक मिश्रा, प्रकल्प अधिकारी किरण बनसोडे आदि मान्यवर व्यासपीठावर […] - [मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सपत्निक उभारली गुढी; आई अंबाबाई चरणी सुख-समृद्धीसाठी साकडे](https://firstmaharashtra.com/2026/03/20/minister-chandrakant-patil-hoists-the-gudi-with-his-wife-prays-to-goddess-ambabai-for-happiness-and-prosperity/): कोल्हापूर : हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या मंगल मुहूर्तावर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोल्हापूर येथील निवासस्थानी सपत्निक पारंपरिक पद्धतीने गुढी उभारली. चैत्र शुद्ध प्रतिपदेचे स्वागत करताना त्यांनी महाराष्ट्राच्या उज्ज्वल परंपरेचा वारसा जपण्याचा संदेश दिला. नूतन वर्षाची सुरुवात करताना चंद्रकांत पाटील यांनी करवीरनिवासिनी आई अंबाबाईचे सपत्निक दर्शन घेतले. देवीच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांनी संपूर्ण राज्याच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. “हे नवीन वर्ष सर्वांच्या आयुष्यात आनंदाची उधळण करो आणि सर्वांचे आयुष्य सुख-समृद्धीने भरून जावो,” अशा शब्दांत त्यांनी जनतेला गुढीपाडव्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. - [मुंबई विद्यापीठातील 'कै. बाळासाहेब आपटे अध्यासन केंद्रा'च्या कामाला वेग; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून आढावा](https://firstmaharashtra.com/2026/03/20/work-at-mumbai-universitys-late-balasaheb-apte-chair-gains-momentum-minister-chandrakant-patil-conducts-review/): मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात उभारण्यात येणाऱ्या कै. बाळासाहेब आपटे अध्यासन केंद्राच्या इमारत बांधकामाचा आढावा घेण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील त्यांच्या शासकीय निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली. नव्या इमारतीच्या बांधकामाची सध्याची प्रगती तपासून पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली. हे अध्यासन केंद्र केवळ वेळेतच नव्हे, तर अत्यंत गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण व्हावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. प्रकल्पात येणारे अडथळे दूर करून बांधकाम वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या तांत्रिक सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या प्रकल्पामुळे मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक सुविधांमध्ये मोलाची भर पडणार असून, विद्यार्थ्यांसाठी हे केंद्र महत्त्वाचे ठरेल. या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण […] - [राज्यातील अनुदानित महाविद्यालयांमध्ये मेगा भरती; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे पदभरती तात्काळ सुरू करण्याचे आदेश](https://firstmaharashtra.com/2026/03/20/mega-recruitment-in-state-aided-colleges-minister-chandrakant-patil-orders-immediate-commencement-of-recruitment-process/): मुंबई : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील रिक्त पदे भरण्याच्या प्रक्रियेला आता वेग येणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील त्यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महाविद्यालयनिहाय पदभरती मान्यतेसाठी पत्र देण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. तसेच, दीर्घकाळ प्रलंबित असलेली पदभरती प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत व संस्थांच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही त्वरीत करण्याचे स्पष्ट निर्देश यावेळी चंद्रकांत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या निर्णयामुळे राज्यातील हजारो पात्र उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून, महाविद्यालयांमधील अपुऱ्या मनुष्यबळाचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. […] - [मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी भाजप सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'एसआयआर' बैठक संपन्न](https://firstmaharashtra.com/2026/03/18/bjp-ready-to-update-voter-lists-sir-meeting-concludes-in-the-presence-of-chief-minister-devendra-fadnavis/): मुंबई : महाराष्ट्रातील मतदार यादी अद्ययावत करण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणाऱ्या ‘एसआयआर’ प्रक्रियेसंदर्भात भाजपा महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनात्मक बैठक पार पडली. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीला भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, एसआयआर अभियानाचे राष्ट्रीय संयोजक व राष्ट्रीय महामंत्री तरुण चुग , एसआयआर अभियानाचे महाराष्ट्र प्रभारी भगवानदास सबनानी , एसआयआरचे प्रदेश संयोजक माजी खासदार किरीट सोमय्या, भाजपा मुंबई अध्यक्ष आ. अमित साटम, प्रदेश सरचिटणीस आ. योगेश सागर, प्रदेश सरचिटणीस आ. संजय कुटे, प्रदेश सरचिटणीस आ. निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस माधवीताई नाईक, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, […] - [विकसित महाराष्ट्राचा संकल्प: ग्रामीण विकासाला केंद्राची मोठी साथ - मंत्री चंद्रकांत पाटील](https://firstmaharashtra.com/2026/03/18/the-pledge-for-a-developed-maharashtra-strong-central-support-for-rural-development-minister-chandrakant-patil/): मुंबई : महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासाला अधिक गती देण्यासाठी केंद्र सरकारने १५ व्या वित्त आयोगांतर्गत (XV-FC) ₹१५१.१८ कोटींचा भरीव निधी वितरित केला आहे. हा केवळ निधी नसून, आपल्या ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांच्या सक्षमीकरणासाठी मिळालेला एक मोठा आधार असल्याचे वक्तव्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. चंद्रकांत पाटील यांनी याचे महत्व अधोरेखित करताना म्हटले, या निधीचा मुख्य वापर ग्रामपंचायतींच्या सक्षमीकरणासाठी, विशेषतः स्वच्छता व्यवस्थापन, ओडीएफ (ODF) दर्जा टिकवणे आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी केला जाईल. तसेच, पिण्याच्या पाण्याचा शाश्वत पुरवठा आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग सारख्या उपक्रमांना यामुळे मोठी चालना मिळणार असल्याचे पाटील म्हणाले. महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाला हे नवे […] - [मनसुखानी महाविद्यालयातील तक्रारींच्या चौकशी अहवालावर आवश्यक कार्यवाही करणार - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील](https://firstmaharashtra.com/2026/03/18/necessary-action-will-be-taken-regarding-the-inquiry-report-on-complaints-at-mansukhani-college-higher-and-technical-education-minister-chandrakant-patil/): मुंबई : उल्हासनगर येथील श्रीमती चांदीबाई हिम्मतला मनसुखानी महाविद्यालयातील कामकाज व इतर काही प्रश्नासंदर्भातील तक्रारींची चौकशी करण्यासाठी गठित समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. या अहवालाच्या आधारे पुढील आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी सांगितले. सदस्य डॉ. मनिषा कायंदे यांनी या विषयी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. पाटील म्हणाले, या महाविद्यालयाच्या निकाल व पुनर्पडताळणी संदर्भातील तक्रारींची चौकशी करण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या डॉ. शिवाजी सरगर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. या महाविद्यालयातील नियुक्ती संदर्भात प्राप्त तक्रारीसंदर्भात पाटील म्हणाले, संबंधित प्रकरणातील नियुक्ती ही २ जानेवारी १९९८ पूर्वी झालेली आहे. त्या काळात अर्जासोबत […] - [समाजकल्याण महाविद्यालयांचा आकृतीबंध प्रस्ताव वित्त विभागाकडे - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील](https://firstmaharashtra.com/2026/03/18/proposal-for-staffing-pattern-of-social-work-colleges-submitted-to-finance-department-higher-and-technical-education-minister-chandrakant-patil/): मुंबई : समाजकल्याण महाविद्यालयांच्या आकृतीबंधासंदर्भातील सुधारित प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य किरण सरनाईक यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य विक्रम काळे, अभिजीत वंजारी, मनीषा कायंदे, जयंत आजगावकर यांनी उपप्रश्न उपस्थित केला. पाटील म्हणाले, समाजकार्य महाविद्यालय २९ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. या विभागांतर्गत असलेल्या अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापकांच्या ११,९१८ रिक्त पदांपैकी ५,०१२ पदांच्या भरतीस ११ फेब्रुवारी २०२६ रोजी मान्यता देण्यात आली आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा अंतिम आकृतिबंध निश्चित झाल्यानंतरच उर्वरित पदभरतीबाबत निर्णय घेतला […] - [शिक्षण शुल्क माफीच्या निर्णयामुळे उच्च शिक्षणातील प्रवेशात मुलींची लक्षणीय वाढ - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील](https://firstmaharashtra.com/2026/03/18/significant-increase-in-girls-admissions-to-higher-education-following-decision-on-tuition-fee-waivers-higher-and-technical-education-minister-chandrakant-patil/): मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे २०२३–२४ आणि २०२४–२५ या वर्षांसाठी जाहीर करण्यात आलेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कारांचा वितरण समारंभ एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या सर सिताराम तथा लेडी शांताबाई पारकर दीक्षान्त सभागृहात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. राज्यातील महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी शासनाकडून विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. उच्च व तंत्र शिक्षणासाठी मुलींचे शिक्षण शुल्क माफ केल्यामुळे सकारात्मक बदल घडून येत असून मुलींच्या प्रवेशात लक्षणीय वाढ होत आहे असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमात शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल कार्यकर्त्यांना गौरविण्यात आले. यावेळी  अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन […] - [राज्यातील महाविद्यालयांमध्ये ६ हजारांहून अधिक प्राध्यापक भरती होणार - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील](https://firstmaharashtra.com/2026/03/17/over-6000-professors-to-be-recruited-in-state-colleges-higher-and-technical-education-minister-chandrakant-patil/): मुंबई : राज्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता नव्या महाविद्यालयांना अनुदानित तत्वावर परवानगी न देण्याबाबतच्या धोरणात बदल करणे शक्य नाही. मात्र अनुदानित महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्राध्यापक भरती केली जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिली. सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पातील उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेला पाटील यांनी उत्तर दिले. मंत्री पाटील म्हणाले की, २००१ मध्ये राज्य सरकारने नव्या महाविद्यालयांना विना-अनुदानित तत्त्वावर परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता. त्या धोरणानुसार महाविद्यालयांमध्ये सुमारे ८० टक्के विद्यार्थ्यांना विविध सवलती दिल्या जातात. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना १०० टक्के शुल्क माफी, ओबीसी विद्यार्थ्यांना ५० टक्के तर मुलींना १०० टक्के […] - [नायगाव बीडीडी चाळवासियांची स्वप्नपूर्ती... अनेक वर्षांपासून हक्काच्या घराची प्रतीक्षा करणाऱ्या कष्टकरी बांधवांना सन्मानाने जगण्याची नवी दिशा मिळाली - मंत्री चंद्रकांत पाटील](https://firstmaharashtra.com/2026/03/16/the-realization-of-dreams-for-the-residents-of-naigaon-bdd-chawl-to-our-hardworking-brethren-who-have-been-awaiting-their-rightful-homes-for-many-years-a-new-path-toward-living-with-dignity-has-op/): मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुला’तील 864 पुनर्वसन सदनिकांचे वितरण पार पडले. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते 14 चाळवासियांना प्रातिनिधिक स्वरूपात सदनिकांची चावी व ताबापत्राचे वाटप करण्यात आले. अनेक वर्षांपासून हक्काच्या घराची प्रतीक्षा करणाऱ्या कष्टकरी बांधवांना सन्मानाने जगण्याची नवी दिशा मिळाली असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. चंद्रकांत पाटील यांनी म्हटले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. अनेक वर्षांपासून हक्काच्या घराची प्रतीक्षा करणाऱ्या कष्टकरी बांधवांना सन्मानाने जगण्याची नवी दिशा मिळाली […] - [पुणे मेट्रो भवन केवळ एक इमारत नसून, पुण्याच्या आधुनिक आणि वेगवान प्रवासाचे केंद्र ठरेल - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील](https://firstmaharashtra.com/2026/03/16/pune-metro-bhavan-will-not-merely-be-a-building-but-will-serve-as-the-hub-of-punes-modern-and-rapid-transit-chandrakant-patil-minister-for-higher-and-technical-education/): पुणे : पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला. अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज अशा ‘पुणे मेट्रो भवन’चे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या सोहळ्याला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. पुणे मेट्रोचे संचालक श्रावण हर्डीकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अत्यंत प्रभावीपणे हे काम पूर्ण केले आहे, त्याबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले. पाटील यांनी म्हटले, हे मेट्रो भवन केवळ एक इमारत नसून, पुण्याच्या आधुनिक आणि वेगवान प्रवासाचे केंद्र ठरेल. पुणेकरांचा प्रवास अधिक सुखकर, प्रदूषणमुक्त आणि वेळेची बचत करणारा […] - [मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद उपाधी प्रदान... ही पदवी बहाल करून त्यांच्या दूरदृष्टीचा एक सन्मान - मंत्री चंद्रकांत पाटील](https://firstmaharashtra.com/2026/03/15/chief-minister-devendra-fadnavis-conferred-with-the-honorary-degree-of-doctor-of-science-bestowing-this-degree-serves-as-a-tribute-to-his-vision-minister-chandrakant-pat/): अहिल्यानगर  : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी’च्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात ३९ वा पदवीप्रदान समारंभ राज्यपाल तथा कुलपती जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. देवेंद्रजींनी आता ‘डॉक्टरेट’ची हॅट्ट्रिक पूर्ण केली आहे, ही आम्हा सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, आज महात्मा फुले कृषी विद्यापीठाने त्यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी बहाल करून त्यांच्या दूरदृष्टीचा एक सन्मान केला आहे. कृषी क्षेत्रातील प्रगती आणि […] - [केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर शस्त्रक्रिया; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची केली विचारपूस](https://firstmaharashtra.com/2026/03/15/union-minister-of-state-murlidhar-mohol-undergoes-surgery-minister-chandrakant-patil-visits-the-hospital-to-inquire-about-his-health/): पुणे : केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया करण्यात आली असून, आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी पाटील यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. मुरलीधर मोहोळ यांना २९ वर्षांपूर्वी कोल्हापुरात कुस्ती खेळताना गंभीर दुखापत झाली होती, ज्यामुळे त्यांची कुस्ती सुटली होती. मात्र, राजकीय आणि सामाजिक कामाच्या व्यापात या जुन्या दुखापतीकडे दुर्लक्ष झाले. अलीकडे हा त्रास असह्य झाल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या डॉक्टरांनी त्यांना महिनाभर सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितले आहे. सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र […] - [महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणे, हा माझा नेहमीच आग्रह - मंत्री चंद्रकांत पाटील](https://firstmaharashtra.com/2026/03/15/securing-a-rightful-market-for-products-created-by-women-has-always-been-my-steadfast-priority-minister-chandrakant-patil/): पुणे  : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या हातातील कौशल्याला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘उत्कर्ष आणि उन्नती फाउंडेशन’च्या वतीने आयोजित महिला उद्योजिकांच्या ‘भव्य प्रदर्शन व विक्री केंद्राचे’ उद्घाटन आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. गुढीपाडव्याचे औचित्य साधून गांधी भवन मैदान येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन महिला उद्योजिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या उत्पादनांचे कौतुक केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणे, हा माझा नेहमीच आग्रह असतो. त्या अनुषंगाने आयोजित हे प्रदर्शन म्हणजे महिलांच्या उत्पादनांसाठी […] ## Pages - [मुखपृष्ठ Copy](https://firstmaharashtra.com/homepage/): [vc_row full_width=”stretch_row” css=”.vc_custom_1589101946016{border-bottom-width: 1px !important;padding-top: 10px !important;padding-bottom: 12px !important;background-color: #ffffff !important;border-bottom-color: #dedede !important;border-bottom-style: solid !important;}”][vc_column][/vc_column][/vc_row][vc_row][vc_column width=”1/6″ offset=”vc_hidden-sm vc_hidden-xs” el_class=”sticky-column”][/vc_column][vc_column width=”2/3″ offset=”vc_col-lg-7 vc_col-md-7 vc_col-xs-12″][/vc_column][vc_column width=”1/3″ offset=”vc_col-lg-3 vc_col-md-3 vc_col-xs-12″ el_class=”sticky-column”][vc_wp_search][/vc_column][/vc_row] - [About Us](https://firstmaharashtra.com/about-us/): First Maharashtra is marathi news portal powered by K10 Media Solutions. - [पिंपरी - चिंचवड](https://firstmaharashtra.com/%e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%b5%e0%a4%a1/): [vc_row][vc_column][/vc_column][/vc_row] - [पुणे](https://firstmaharashtra.com/%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a5%87/): [vc_row][vc_column][/vc_column][/vc_row] - [मुखपृष्ठ](https://firstmaharashtra.com/): [vc_row full_width=”stretch_row” css=”.vc_custom_1589101946016{border-bottom-width: 1px !important;padding-top: 10px !important;padding-bottom: 12px !important;background-color: #ffffff !important;border-bottom-color: #dedede !important;border-bottom-style: solid !important;}”][vc_column][/vc_column][/vc_row][vc_row][vc_column width=”1/6″ offset=”vc_hidden-sm vc_hidden-xs” el_class=”sticky-column”][/vc_column][vc_column width=”2/3″ offset=”vc_col-lg-7 vc_col-md-7 vc_col-xs-12″][/vc_column][vc_column width=”1/3″ offset=”vc_col-lg-3 vc_col-md-3 vc_col-xs-12″ el_class=”sticky-column”][vc_wp_search][/vc_column][/vc_row] - [Homepage 2](https://firstmaharashtra.com/homepage-2/): [vc_row][vc_column][/vc_column][/vc_row][vc_row][vc_column width=”2/3″][/vc_column][vc_column width=”1/3″ el_class=”sticky-column”][/vc_column][/vc_row][vc_row][vc_column][vc_column_text][/vc_column_text][/vc_column][/vc_row][vc_row][vc_column width=”1/3″ el_class=”sticky-column”][/vc_column][vc_column width=”2/3″][/vc_column][/vc_row] - [test page](https://firstmaharashtra.com/test-page/): [vc_row][vc_column][/vc_column][/vc_row][vc_row][vc_column][/vc_column][/vc_row] - [गॅलरी](https://firstmaharashtra.com/%e0%a4%97%e0%a5%85%e0%a4%b2%e0%a4%b0%e0%a5%80/): [vc_row][vc_column][/vc_column][/vc_row] - [महाराष्ट्र](https://firstmaharashtra.com/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0/): [vc_row][vc_column][/vc_column][/vc_row] - [इतर](https://firstmaharashtra.com/%e0%a4%87%e0%a4%a4%e0%a4%b0/): [vc_row][vc_column][/vc_column][/vc_row] - [व्हिडिओ](https://firstmaharashtra.com/%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a1%e0%a4%bf%e0%a4%93/): [vc_row][vc_column][/vc_column][/vc_row] - [फोटो](https://firstmaharashtra.com/%e0%a4%ab%e0%a5%8b%e0%a4%9f%e0%a5%8b/): [vc_row][vc_column][vc_gallery interval=”3″ title=”फोटो”][/vc_column][/vc_row] - [स्पेशल](https://firstmaharashtra.com/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%b2/): [vc_row][vc_column][/vc_column][/vc_row] - [लाईफस्टाईल](https://firstmaharashtra.com/%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%ab%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%b2/): [vc_row][vc_column][/vc_column][/vc_row] - [कृषी](https://firstmaharashtra.com/%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%80/): [vc_row][vc_column][/vc_column][/vc_row] - [क्रिडा](https://firstmaharashtra.com/%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%a1%e0%a4%be/): [vc_row][vc_column][/vc_column][/vc_row] - [मनोरंजन](https://firstmaharashtra.com/%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8/): [vc_row][vc_column][/vc_column][/vc_row] - [शैक्षणिक](https://firstmaharashtra.com/%e0%a4%b6%e0%a5%88%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3%e0%a4%bf%e0%a4%95/): [vc_row][vc_column][/vc_column][/vc_row] - [राजकीय](https://firstmaharashtra.com/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%af/): [vc_row][vc_column][/vc_column][/vc_row] - [देश- विदेश](https://firstmaharashtra.com/%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6/): [vc_row][vc_column][/vc_column][/vc_row] - [खान्देश](https://firstmaharashtra.com/%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6/): [vc_row][vc_column][/vc_column][/vc_row] - [विदर्भ](https://firstmaharashtra.com/%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ad/): [vc_row][vc_column][/vc_column][/vc_row] - [कोकण](https://firstmaharashtra.com/%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%a3/): [vc_row][vc_column][/vc_column][/vc_row] - [मराठवाडा](https://firstmaharashtra.com/%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a4%be/): [vc_row][vc_column][/vc_column][/vc_row] - [प. महाराष्ट्र](https://firstmaharashtra.com/%e0%a4%aa-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0/): [vc_row][vc_column][/vc_column][/vc_row] - [मुंबई](https://firstmaharashtra.com/%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%88/): [vc_row][vc_column][/vc_column][/vc_row] - [Privacy Policy](https://firstmaharashtra.com/privacy-policy-2/): [vc_row][vc_column][vc_column_text] Who we are First Maharashtra is  powered by K10 Media Solutions. This privacy policy is intended to explain what First Maharashtra does with your information. First Maharashtra reserves right to update or modify privacy policy.   What personal data we collect and why we collect it Comments When visitors leave comments on the site we collect the data shown in the comments form, and also the visitor’s IP address and browser user agent string to help spam detection. After approval of your comment, your profile picture is visible to the public in the context of your comment. Media If […] - [Sample Page](https://firstmaharashtra.com/sample-page/): This is an example page. It’s different from a blog post because it will stay in one place and will show up in your site navigation (in most themes). Most people start with an About page that introduces them to potential site visitors. It might say something like this: Hi there! I’m a bike messenger by day, aspiring actor by night, and this is my website. I live in Los Angeles, have a great dog named Jack, and I like piña coladas. (And gettin’ caught in the rain.) …or something like this: The XYZ Doohickey Company was founded in 1971, […] - [Sample Page](https://firstmaharashtra.com/sample-page-2/): This is an example page. It’s different from a blog post because it will stay in one place and will show up in your site navigation (in most themes). Most people start with an About page that introduces them to potential site visitors. It might say something like this: Hi there! I’m a bike messenger by day, aspiring actor by night, and this is my website. I live in Los Angeles, have a great dog named Jack, and I like piña coladas. (And gettin’ caught in the rain.) …or something like this: The XYZ Doohickey Company was founded in 1971, […] [comment]: # (Generated by Hostinger Tools Plugin)