नरसिंग यादव निलंबित
![](https://firstmaharashtra.com/wp-content/uploads/2019/04/narsing-yadav-750x430.jpg)
काँग्रेस उमेदवार संजय निरुपम यांच्या प्रचाराला उपस्थित राहून कुस्तीपटू आणि एसीपी नरसिंग यादव अडचणीत आला आहे.
निरुपम यांच्या प्रचारासाठी उपस्थित राहिल्यामुळे नरसिंग यादव याच्यावर महाराष्ट्र पोलिसांनी थेट निलंबनाची कारवाई केली आहे. सध्या नरसिंग हा सहाय्यक पोलिस आयुक्त या पदावर असून नियमानुसार कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला निवडणुकीत उमेदवाराचा प्रचार करता येत नाही. असे असून देखील निरुपम यांच्या प्रचारात नरसिंह हे सहभागी झाला होता. त्याच्याविरोधात अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान,नरसिंग यादवला उत्तेजक सेवनाच्या आरोपांमुळे रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होता आले नाही. त्याच्यावर चार वर्षांची बंदीही घालण्यात आली. या बंदीचा कालावधी संपत आलेला असताना त्याच्यासमोर हे नवे संकट उभे राहिले आहे.