जयंत पाटीलांची हुतात्म्यांना श्रद्धांजली

2

आज महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबई येथील हुतात्मा स्मारक इथे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या १०५ हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली.. त्यांच्या सोबत मुंबई राष्ट्रवादी काँग्रेससह राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

  उद्या जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सांभाळून एक वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्ताने ते उद्या सायं. ५ वाजता फेसबुक पेज च्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.