तब्बल ११ वर्षांनंतर हि जोडी ‘मिस यू मिस्टर’ मध्ये एकत्र
सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे यांची केमिस्ट्री ‘मिस यू मिस्टर’ या आगामी मराठी चित्रपटात आपल्याला तब्बल ११ वर्षांनंतर पाहायला मिळणार आहेत. दिग्दर्शक मिलिंद उके यांच्या ‘हमने जिना सीख लिया’ या हिंदी चित्रपटात हि जोडी सर्वप्रथम एकत्र आली. ऑक्टोबर २००७ ला हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. ‘मिस यू मिस्टर’ चित्रपटाचा फर्स्ट लुक सोशल मीडियावर प्रकाशित करण्यात आला आहे .