अकोला : राष्ट्रीय कुस्तीपटू शुभम मोरेश्वर कडोळेची गळफास घेऊन आत्महत्या

राष्ट्रीय कुस्तीपटू शुभम मोरेश्वर कडोळे याने डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या आवारातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार काल रात्री उघडकीस आला.
शुभम कडोळे (वय २६, रा. खेडकरनगर, अकोला) याने राष्ट्रीय स्तरावर कुस्तीत अनेक विजेतेपद पटकाविले आहे. तो संगणक अभियंता होता. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील शिव मंदिराच्या पाठीमागे असलेल्या एका नाल्यातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेतील एका तरुणाचा मृतदेह आढळून आला.
पोलिसांनी तो खाली उतरुन पाहणी केल्यावर तो शुभम कडोळे याचा असल्याचे स्पष्ट झाले. एमआय डीसी पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह सर्वोपचार रुग्णालयात पाठविला आहे.
शुभम याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. शुभम याचे वडिल मोरेश्वर हे अकोल्यात कुस्ती संस्था चालवितात. तर त्याची आई सुनीता कडोळे या राज्यातील पहिल्या महिला कुस्ती वस्ताद आहेत.