५ सप्टेंबरपासून सुरू होणार’जिओ फायबर’ सेवा

24 802

 देशातील अब्जाधीश उद्योगपती असलेल्या मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमटेडची (RIL) आज (ता.१२) वार्षिक सर्वसाधारण सभा होत आहे. या बैठकीमध्ये रिलायन्सकडून अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. 

 जिओला ५ सप्टेंबर रोजी तीन वर्ष पूर्ण होत आहे. हा प्लॅन ७०० रुपयांपासून असणार आहे. अमेरिकेत सध्या सध्या ९० एमबीपीएस स्पीड आहे. जिओचे स्पीड १०० एमबीपीएस ते एक जीबीपीएसपर्यंत असणार आहे. जगातील सगळ्यात बेस्ट ब्राँड बँड असल्याचे अंबानी यांनी सांगितले. 

     जागतिक बाजारपेठेच्या तुलनेत एक दशांश किमतीमध्ये ही सेवा उपलब्ध होणार असल्याचे अंबानी यांनी सांगितले. ७०० ते १०,००० रुपये प्रति महिना टेरिफ प्लॅन उपलब्ध होणार आहेत. यामध्ये सगळे व्हॉईस कॉल्स फ्री, अनलिमिटेड इंटरनॅशनल कॉल, अमेरिका व कॅनडा ५०० रुपये प्रति महिना. त्याचबरोबर जिओ फायबरमध्ये बहुतेक सगळे ओटीटी प्लॅटफॉर्म असणार आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.