‘देवांश’ ला बाळूमामांचा आशीर्वाद

सध्या कोरोनाच्या महासंकटाला संपूर्ण जग, देश, राज्य सामोरे जात असल्यामुळे अनेक सार्वजनिक आणि लहान – मोठ्या प्रमाणावर साजरे होणारे कार्यक्रम आणि सोहळे नागरिकांना साजरे करता येणार नाही असे निर्देश शासनाने दिले आहेत, यामुळे अनेक कार्यक्रम रद्द झाले आहेत.
पहिला वाढदिवस म्हंटल कि समोर येत ते सेलीब्रेशन, मौज, मज्जा आणि खूप सारे गिफ्ट्स. आपल्या मुला-मुलीचा पहिला वाढदिवस चांगल्या थाटा-माटात साजरा करणे हि सगळ्या आई-वडिलांची इच्छा असते, का नसावी त्यांच्या काळजाच्या तुकड्याच्या तो पहिला वाढदिवस असतो.
आयटी क्षेत्रात काम करणारा पुण्यातील पण सध्या जर्मनी मध्ये असलेला महेश लोकरे आणि पुण्यात महेशच्या कुटुंबीयांसोबत राहणारी महेशची पत्नी पूनम यांचा देवांश याचा आज ( 29 एप्रिल ) पहिला वाढदिवस, हा पहिला वाढदिवस मोठ्या थाटात पुण्यामध्ये करण्याचं या दोघांनी ठरवल होत, पण अचानक कोरोनाच संकट ओढवल आणि संपूर्ण देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आलं. सगळ्या देशाच्या सीमा सील करण्यात आल्या. प्रवासाची साधन अचानकच पूर्णपणे बंद करण्यात आली . विमानसेवाही संपूर्णपणे रद्द करण्यात आल्या. या अचानक झालेल्या लॉकडाऊनमुळे आपल्या घरापासून लांब असणारे सगळेच लोक अडकले गेले, त्यातलाच एक म्हणजे महेश लोकरे . महेश लवकरच जर्मनीतील आपल काम संपवून एप्रिल महिन्यात आपल्या मायदेशी परत येणार होता तस विमानच बुकिंगही त्याने केल होत. पण या कोरोनाने त्यालाही तिथेच थांबवल. महेश जर्मनीत सध्या घरात राहून आपली काळजी घेत आहे , पण त्याला त्याच्या लाडक्या छकुल्याच्या वाढदिवशी काहीतरी स्पेशल करायची फारच इच्छा होती, आणि त्याची हि इच्छा पूर्ण झाली. महेशच्या लाडक्या देवांशला बाळूमामाचाच आशीर्वाद मिळालाय. ‘बाळूमामाच्या नावान चांगभल’ या मालिकेतील बाळूमामाची भूमिका बजावणारा संवेदनशील कलाकार सुमित पुसावळे याला जेंव्हा हि गोष्ट समजली तेंव्हा क्षणाचाही विलंब न लावता त्याने अगदी देवांशला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा व्हिडीओ रुपात पाठविल्याच, पण त्यासोबतच आपुलकीने दोघा माय लेकरांना घरीच राहा असा सल्ला हि दिला. देवांश, पूनम, महेश आणि पुण्यात असणाऱ्या संपूर्ण कुटुंबियांसाठी हा पहिला वाढदिवस आता अविस्मरणीय झाला आहे, बाळूमामांच्या आशीर्वादामुळे, म्हणूनच आवर्जून म्हणावं वाटत ‘ बाळूमामाच्या नावान चांगभल’…