पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा आणि रायन थोरपे दोघांना जामिन मंजूर

7

मुंबई: पोर्नोग्राफी प्रकरणात अटक झालेल्या राज कुंद्रा आणि त्यांचा साथीदार रायन थोरपे यांना जमीन मंजूर झाल आहे. राज कुंद्रा यांच्यावर अश्लील चित्रपट बनवल्याचा आरोप लावण्यात आला आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर त्याच्या कंपनीचा आयटी हेड रायन थोरोपे यालाही रायगडमधून अटक करण्यात आली होती. रायन थोरोपे हा राज आणि शिल्पा शेट्टीचा अतिशय जवळचा व्यक्ती आहे. रायनने अनेक वर्षे राज आणि शिल्पा शेट्टी यांच्या कंपन्या ‘वियान गेमिंग प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘वियान इंडस्ट्रीज लिमिटेड’ या कंपन्यांमध्ये अनेक वर्ष काम केले आहे.

राज कुंद्रा याला 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. Metropolitan magistrate court ने राज कुंद्राला जामीन मंजूर केला आहे. राज कुंद्राला पोर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पॉर्न प्रकरणात त्याचं नाव आल्यानंतर गहना वसिष्ठ, शर्लिन चोप्रा यांनीही त्याच्यावर काही आरोप केले होते.

काय आहे प्रकरण?

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली होती. गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्रा अश्लील चित्रपट तयार करण्यासाठी वित्त पुरवठा करत होता. अभिनेत्री गहना वशिष्ठला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक झाल्यानंतर चौकशीचे धागेदोरे राज कुंद्रापर्यंत पोहोचले होते.

गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्राचे नातेवाईक प्रकाश बक्षी यूकेमध्ये राहतात. त्यांची यूके स्थित केनरिन प्रॉडक्शन हाऊस नावाची कंपनी देखील आहे. प्रकाश बक्षी चेअरमन असलेल्या या कंपनीचे राज कुंद्रा पार्टनरही आहेत. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या कुंद्रा या कंपनीचा मालक आणि गुंतवणूकदार आहे. राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत हा केनरिन प्रॉडक्शन हाऊसचा भारतातील प्रतिनिधी होता. ही कंपनी अनेक एजंट्सना अश्लील चित्रपटांची निर्मिती करण्याचे कंत्राट आणि आर्थिक सहाय्य देत असल्याचा आरोप आहे.

मुंबई पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज कुंद्राने या अश्लील चित्रपट बनवण्याच्या उद्योगात सुमारे 8 ते 10 कोटींची गुंतवणूक केली होती. तसेच, या व्हिडीओंचे शूटिंग भारतात करण्यात आले आणि त्यानंतर वी-ट्रान्सफर मार्गे यूकेला हस्तांतरित केले गेले होते.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.