पिंपरीत दारुच्या नशेत असलेल्या व्यक्तीची गला चिरुन हत्या

पिंपरी: पिंपरी चिंचवड येथे नेवाळे वस्तीत दारुच्या नशेत असलेल्या व्यक्तीचा गला चिरुन हत्या करण्यात आली. मात्र त्याची हत्या कोणी आणि का केली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

खून  झालेल्या व्यक्तीचे नाव वीरेंद्र वसंत उमरगी आहे. . वीरेंद्र उमरगी यांचे पत्नीशी भांडण झाले होते. त्यामुळे मागील तीन महिन्यांपासून ते विभक्त राहत होते..

वीरेंद्र यांना दारु पिण्याचे व्यसन होते. दारु पिणारे मित्र त्यांच्याकडे ये-जा करत असल्याची माहिती समोर येत आहे. दोन दिवसांपासून त्यांचे घर बंद होते. त्यांच्या एका मित्राने फोन केला पण वीरेंद्र यांनी उचलला नाही. त्यामुळे मित्राने वीरेंद्र यांच्या घरी येऊन पाहिले असता त्यांचा मृतदेह आढळून आला. वीरेंद्र यांची दारुच्या नशेत हत्या झाल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले असून आरोपी फरार झाले आहेत.