दिल्ली हादरली! वकिलाच्या वेशात गोळीबार, गँगस्टरसह चौघे ठार

दिल्लीतील न्यायालयाच्या परिसरात भरदिवसा घडली घटना

नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीत न्यायालयाच्या परिसरातच कुख्यात गुंडाची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. रोहिणी न्यायालायच्या परिसरात भरदिवसा घडलेल्या या घटनेनं दिल्ली हादरली.

फिल्मी स्टाईल हत्याकांडाने दिल्ली हादरली आहे. हल्लेखोरांनी मोस्ट वॉन्टेड गुंड जितेंद्र मान उर्फ ​​गोगीची  गोळ्या घालून हत्या केली. त्या दरम्यान न्यायालयाच्या आवारात गोळीबाराचा थरार झाला. यावेळी हल्लेखोरही ठार झाले. या गोळीबारात आतापर्यंत चौघा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी एक गँगस्टर जितेंद्र आहे, तर जितेंद्रवर हल्ला करण्यासाठी आलेल्या तीन हल्लेखोरांचाही समावेश आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन हल्लेखोर वकिलांच्या रूपात न्यायालय परिसरात घुसले होते. त्यांनी गुंड जितेंद्रवर गोळीबार केला. स्पेशल सेलच्या टीमने जितेंद्रला कोर्ट रूममध्ये नेले होते. तिथे हा थरारक प्रसंग घडला. दिल्लीच्या टिल्लू टोळीने जितेंद्रची हत्या केल्याचा संशय आहे. जे हल्लेखोर ठार झाले आहेत त्यातील एकाचं नाव राहुल आहे, ज्याच्यावर 50 हजारांचे बक्षीस होते. तर दुसराही वॉन्टेड गुंड होता.

गुंड जितेंद्रला दोन वर्षांपूर्वी गुरुग्राममधून स्पेशल सेलने अटक केली होती. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या मते, जितेंद्र गोगीने गुन्हेगारीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात संपत्ती जमवली होती. जितेंद्र गोगीच्या नेटवर्कमध्ये 50 हून अधिक गुन्हेगार आहेत. विशेष म्हणजे जितेंद्र गोगीला 2020 मध्ये गुरुग्राम येथून अटक करण्यात आली होती. गोगीसह कुलदीप फज्जाच्याही मुसक्या आवळल्या होत्या. 25 मार्च रोजी कुलदीप फज्जा कोठडीतून पळून गेला. फज्जा जीटीबी रुग्णालयातून पळून गेला होता त्यानंतर त्याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला होता.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!