कोणावरही अशी वेळ येऊ नये; करुणा शर्मा प्रकरणावर पंकजा मुंडे म्हणतात….

8

बीड: जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मा यांना बीडमधील अंबाजोगाई सत्र न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला. न्यायालयाने करुणा शर्मा यांना २५ हजारांच्या जातमुचलक्यावर जमिनीवर सुटका केली.

करूणा शर्मा प्रकरणानंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी सूचक ट्विट करत अन्याय चुकीच्या लोकांच्यात ताकत असल्यामुळे होतो असे नाही, पराक्रमी हात बांधून बसतात म्हणुन होतो असं म्हटलं होतं. दरम्यान त्यांनी पुन्हा एकदा या प्रकरणावर भाष्य केलं आहे. त्या एका वृत्तवाहनीशी बोलत होत्या.

जेव्हा आपण राजकारणात पराक्रमी या शब्दाशी जोडलो जातो, आणि तो जेव्हा हात बांधतो तेव्हा व्यवस्था कोलमडते. म्हणजे चुकीच्या घटना घडल्याने व्यवस्था कोलमडत नाही, तर चुकीच्या घटनांवर आपण ज्या पद्धतीने व्यक्त होतो त्यामुळे ती कोलमडते. त्यामुळे मला आत्ताचं राजकारण सभ्य म्हणायला नकोसं वाटतं. तसंच मी अशा कोणत्याही प्रकरणाकडे अनादर याच नजरेनेच पाहते. कोणीवरही अशा घटनांना सामोरं जाण्याची वेळ येऊ नये. पण अशी वेळ का येते हे मी सांगू शकत नाही कारण मी त्याचा भाग नाही. अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली.

पंकजा मुंडेंनी ट्वीटमध्ये काय म्हटलं होतं

“अन्याय चुकीच्या लोकांच्यात ताकत असल्यामुळे होतो असे नाही, पराक्रमी हात बांधून बसतात म्हणुन होतो. शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था कोणी आपल्या दारात नाही बांधू शकत, हा विश्वास हरवू नये. wrong Precedent should not be set! ही काळाची गरज आहे. परळी सुन्न आहे मान खाली गेली आहे राज्याची.” असं पंकजा मुंडे यांनी ट्विद्वारे म्हटलं होतं.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.