नेहमी साडीत दिसणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘हा’ हॉट-बोल्ड लुक पाहून चाहते हैराण!

मुंबई: ‘दीया और बाती हम’ मालिके मधून पदार्पण करणारी दीपिका सिंह गोयल तिच्या या सिरीयल मधल्या अजरामर व्यक्तिरेखेमुळे अत्यंत संस्कृत आणि सालस व्यक्तिमत्त्व असणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. पण अभिनेत्री म्हटली की ती आपल्या व्यक्तिरेखे प्रमाणे बदल करणारच ना! तर खऱ्या आयुष्यात दीपिका अत्यंत हॉट-बोल्ड आहे आणि प्रेक्षकांना तिचे ते रूप सुद्धा खूप जास्त आवडले. सोशल मीडियावर खूप जास्त एक्टीव्ह असणारी दीपिका सतत आपल्या वेगवेगळ्या लुकचे फोटोज टाकत असते आणि तिच्या प्रत्येक फोटोला तिच्या चाहत्यांचे खूप प्रेम देखील मिळते.

दीपिका सिंगचे केस हे खूप सरळ, रेशमी आणि सिल्की आहेत. दीपिकाचा अवतार हा काहीसा बोल्ड असला तरी तिच्या लुकमध्ये भारतीय नारीची छाप आजही दिसून येतेच. ती आपल्या केसांची वेणी किंवा आंबाडा बांधते. पण गेल्या काही दिवसांत तिने मोकळे केस ठेवून सुद्धा चाहत्यांना वेड लावले आहे.

टाइट फिटेड टॉप आणि हॉट पँट मध्ये आपल्या सौंदर्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या दीपिका सिंहला पाहताच तिच्यात एखाद्या टीनेजर मुलीची झलक दिसून येते. चेहऱ्यावरचा सालसपणा सोबत हेअर स्टाईल यामुळे तिची क्युटनेस आणि हॉटनेस दोन्ही संतुलित राहिलं आहे. दीपिका सिंहने आपल्या मोकळ्या केसांना फ्रंट पासून बॅक पर्यंत घेऊन जात हलका रॉल केले आहे आणि मग त्यांना हेअर पिनच्या सहाय्याने टक केले आहे. बस्स फक्त ह्या छोट्याश्या स्टेपने तिच्या पूर्ण लुकला अजूनच आकर्षक करून त्यात नवीन ट्विस्ट अॅड केला.