शाळे पाठोपाठ आता, राज्यातील चित्रपटगृह ‘या’ तारखेपासून होणार सुरू, राज्य सरकारचा निर्णय
मुंबई: राज्यातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आलेली असून, राज्य सरकारने हळूहळू जनजीवन पूर्णपणे पूर्वपदावर आणण्याच्या दिशेनं पावलं टाकण्यास सुरूवात केली आहे. शाळा आणि धार्मिक स्थळं सुरु करण्याच्या निर्णयानंतर आता चित्रपट व नाट्यगृहांना सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
कोरोनाची दुसरी लाट राज्यात ओसरली आहे. मात्र, तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्यानं राज्य सरकारने निर्बंध शिथील करताना सावध पावलं टाकली होती. राज्यातील परिस्थिती आटोक्यात आल्याचं चित्र असून, राज्य सरकारनेही हळूहळू जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी निर्बंध शिथील करण्यास सुरूवात केली आहे.
दरम्यान आज सकाळी राज्यातील शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. आता, 4 ऑक्टोबरपासून कोरोना नियमांचं पालन करुन शाळा सुरु होतील. कोरोनाची स्थिती सामान्य झाल्यानं राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.
राज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात ऑगस्ट महिन्यात एकदा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी तो निर्णय स्थगित करण्यात आला होता. मुख्यमंत्री यांनी कोरोनाचे नियमांचं पालन करुन शाळा सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. गेल्या वर्षीपासून शाळा बंद होत्या. कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यानं शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बहुतांश ठिकाणी लसीकरण झालं आहे. शिक्षक आणि शालेय कर्मचारी यांचं लसीकरण झालेलं आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.