भंडारा जिल्हात सोने चमकविन्याच्या बहान्याने 20 वर्षांच्या मुलाकडून सोने लंपास

भंडारा: भंडारा तालुक्याच्या भिलेवाडा येथे सेल्समेन बनून तांबे, चांदी,सोने चमकविन्याचे प्रोडक्ट घेऊन आला आणि 18 हजार रुपयांचे सोने पळवून नेले आहे. सोने चमकविन्याची भूरळ पडली महागात. होय दुपारच्या वेळेत पुरुष मंडळी घरी नसल्याचे हेरुन दोन भामटयांनी दागिने चमकविण्याच्या नावावर महिलांचे सोने घेऊन पळ काढल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कारधा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
भिलेवाडा येथील सुरभी संदीप गाढवे यांच्या घरी दुपारच्या सुमारास दोन अनोळखी तरुण सेलमन्स बनून आले. आपण तांबे, चांदी,सोने चमकविण्याचे प्रोडक्ट घेऊन आलो असल्याची बतावणी करुन सुरुवातीला तांबे, पितळीचे दागिने चमकवून देतो असे सांगून त्यांनी महिलांना बोलण्यात गुंतवलं. महिलांनीही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत आपले दागिने भामट्यांच्या हवाली केले.
सोन्याची गळसोरी, एक डोरले, सोन्याचे छोटे मनी तसंच विविध प्रकारचे सोन्याचे दागिने महिलांनी भामट्यांकडे हवाली केले. गॅसवर उकळत्या पाण्यात दागिने साफ करून देतो असे सांगून मोठ्या चलाखीने गॅसवरील भांडयात दागिने ठेवल्याचे भासवून ह्या दोन आरोपींनी तिथून पळ काढला.
काही वेळानंतर आपली फसवणूक झाल्याचे कळाल्यावर घरचे पुरुष मंडळी आल्यावर संबधित प्रकार उघडीस आला असून उशिरा कारधा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस सीसीटीव्हीच्या आधारे चोरांचा शोध घेत आहे. या घटनेनंतर कोणी अनोळखी व्यक्ती दागिने साफ करण्याची बतावणी करत असेल तर वेळीच सावधान होण्याची गरज आहे.