सामूहिक बलात्कार प्रकरणातील कोणत्याही आरोपीची गय केली जाणार नाही – एकनाथ शिंदे

ठाणे: डोंबिवलीत झाल्यालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील कोणत्याही  आरोपीची गय केली जाणार नाही. हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येणार असल्याची माहिती ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी दिली.

ठाण्यातील रस्ते दुरुस्तीच्या कामाच्या पाहणी दौऱ्याच्या वेळी पत्रकारांशी बोलतांना शिंदे यांनी ही माहिती दिली. डोंबिवलीतील सामूहिक बलात्काराची घटना निंदनीय असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. ते म्हणाले, आतापर्यंत या घटनेतील ३३ आरोपींची नावे समोर आली असून, त्यातील २७ जणांना मानपाडा पोलिसांनी  ताब्यात घेतले आहे. यातील आरोपी कितीही मोठा असला किंवा तो कोणत्याही राजकीय पदाधिकाऱ्याचा नातेवाईक असला तरी त्याची गय केली जाणार नाही. संबंधितांवर कडक कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त जयजित सिंग यांना दिले आहेत.  तसेच अशा घटना पुन्हा होणार नाही, अशी कायद्याची जरब राहील, अशी कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना केल्या आहेत.

नेमकं प्रकरण काय?

डोंबिवलीत 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे डोंबिवली हादरली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात 29 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोन अल्पवयीन मुलांसह 23 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. विशेष म्हणजे आरोपींमध्ये काही राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक असल्याची देखील प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!