राज कुंद्राच्या जामिनानंतर, सोशल मिडीयावर शिल्पा शेट्टी यांची ‘ही’ पोस्ट चर्चेत!

मुंबई: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती बिझनेसमन राज कुंद्रा जवळ-जवळ २ महिन्यांनी जेलमधून बाहेर आला आहे. राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक केल्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या. हे दोन महीने शिल्पा शेट्टीसाठी पण अत्यांत कठीण होते, या दरम्यान शिल्पाने अनेकदा तिच्या इन्स्टाग्रामवर मोटिवेशनल पोस्टा शेअर करताना दिसली आहे. राजच्या अटकेनंतर काही अठवड्यांनी शिल्पा शेट्टीने कामाला पुन्हा सुरूवात केली आणि ती या परिस्थितीन बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

शिल्पाने एका पुस्तकाच्या पानाचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यात लिहिले आहे की, ‘स्वतःवर अवलंबून : अडचणींचा सामना केला, मुख्य पात्र होता, तो पडला. त्याने स्वतःच्या कृतीची जबाबदारी घेतली आणि नंतर स्वतःचे निर्णय घेतले.’

त्यात पुढे लिहिले आहे की, ‘जे काही आपण करतो किंवा करत नाही, त्याला शेवटी आपणच जबाबदार असतो. जर आपण भाग्यवान असू तर, आपल्याला मित्र आणि कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल, परंतु एका वेळी आपल्यालाच निर्णय घ्यावे लागतील आणि त्यासाठीची जबाबदारी घ्यावी लागेल. बरोबर की चूक, ते तुमच्यावर अवलंबून आहे. आपण एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि आपल्याला मिळालेल्या सल्ल्याचे पालन करायचे. जर गोष्टी योग्य झाल्या, तर उत्तम आणि जर नसेल तर आपल्याला जबाबदारी घ्यावी लागेल आणि पुढे जावे लागेल.’

त्यात पुढे लिहिले आहे की, ‘मला खूप सल्ला आणि पाठिंबा मिळाला, पण शेवटी मी ओळखले की आयुष्याचे निर्णय घेण्यासाठी सर्वकाही माझ्यावर अवलंबून आहे.’ शिल्पाची ही पोस्ट राजच्या सुटकेनंतरची आहे आणि कुठेतरी हे पोस्ट तिच्या आयुष्यावर अवलंबून आहे. सध्या शिल्पा पूर्णपणे तिच्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे. तो शो जज करत आहे. यासोबतच ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!