आरोग्य विभागाच्या परीक्षांची तारीख जाहीर 24 आणि 31 ऑक्टोबरला होणार परीक्षा – राजेश टोपे

मुंबई: ज्या आरोग्य विभागाच्या परीक्षांवरून घोळ झाला होता ऐनवेळी त्या परीक्षांची तारीख आता जाहीर झाली आहे. क विभागाची परीक्षा 24 तारखेला आणि ड विभागाची परीक्षा 31 ऑक्टोबरला होणार आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत ही माहिती दिली आहे. न्यासा या संस्थेने या परीक्षेची तारीख जाहीर केली होती.

राजेश टोपे यांनी यावेळी 9 दिवस आधी हॉलतिकीट दिले जाईल, अशी देखील माहिती दिली. विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका कुठलेही चुकीचे काम होऊ देणार नाही, असं म्हटलं. मोठ्या स्वरुपाची परीक्षा होत असेल तर अशा वावड्या उठताता. त्यावरकारवाईच्या सूचना दिल्या आहेत. कुणीही काहीही चुकीच्या गैर मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला तर संबंधित विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पोलीस स्टेशनला तक्रार करावी. परीक्षा पारदर्शकचं व्हाव्यात  काही असेल तर तातडीने पोलिसात तक्रार नोंदवा, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं. चुकीच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका, चुकीचं काही दिसत असेल तर तातडीनं तक्रार दाखल करा, असं राजेश टोपे म्हणाले.

न्यासा ही संस्था आरोग्य विभागाने ठरवली नव्हती.  सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत असलेल्या माहिती तंत्रज्ञान विभागाने 5 एजन्सी निवडल्या आहेत.  आरोग्य विभागाचं काम हे परीक्षेचा पेपर तयार करणे हे काम होतं. पेपर प्रिटिंग, परीक्षा केंद्र निवडणं, इतर बाबी या संबंधित एजन्सीच्या असतात. आरोग्य विभागानं पेपर तयार करुन त्यांच्याकडे सोपवण्याचं काम केलंलं आहे.  या संस्थेचं अन्य विभागाच्या परीक्षा घेण्यासाठी काम केलंलं आहे, असं सांगण्यात आलं. मात्र, प्रश्नपत्रिका  तयार करणं हेचं आमचं काम असल्याचं राजेश टोपे म्हणाले.