नगरमध्ये धक्कादायक घटना: मुल होत नसल्याने बायकोला मित्रासोबत संबंध ठेवण्याची बळजबरी

अहमदनगर: अहमदनगरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. आपल्याच बायकोला मुल होत नसल्याच्या कारणावरुन मित्रा सोबत अनैतिक संबंध ठेवण्यासाठी नकऱ्याकडून जबदस्ती करण्यात आली आहे. याप्रकरणी पती आणि त्यांच्या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे.

मूल होत नाही म्हणून पतीनेच आपल्याला जबदस्ती त्याच्या मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितल्याचा आरोप पत्नीने केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात पतीच्या मदतीने त्याच्या मित्रानेच विवाहितेवर अत्याचार केले. पती आणि त्याच्या मित्रालाही पोलिसांनी अटक केली. पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

मुंबईत अल्पवयीन मुलीवर इन्स्टाग्राम फ्रेण्ड्सचा बलात्कार

दुसरीकडे, मुंबईत एका अल्पवयीन मुलीवर एकाच रात्री तीन वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना काही महिन्यांपूर्वी उघडकीस आली होती. इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या मुलीच्या एका मित्राने वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती. त्याने या पार्टीसाठी मुलीलादेखील बोलावलं होतं. ते सर्व मढ परिसरातील हॉटेलबाहेर भेटले. त्यांनी तिथे वाढदिवस साजरा केला. ते त्या ठिकाणी गाडीतून पोहोचले होते. त्यांनी केक कारमध्ये ठेवून वाढदिवस साजरा केला.

वाढदिवस साजरा केल्यानंतर मुलीच्या दोन इन्स्टाग्राम मित्रांनी गाडीच्या आत नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ती जागा सोडल्यानंतर मुलगी मालाड भागातील एका मित्राच्या घरी गेली. पण तिथे त्या मित्रानेही तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर मुलगी तिथल्या घरातून कसंबसं बाहेर पडली. ती दुसर्‍या मित्राच्या घरी गेली. तिथे त्याही मित्राने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप झाला होता.