अर्जन कपूरची पोस्ट व्हायरल; रणबीरच्या वाढदिवसाला आलियाकडे केली ‘ही’ मागणी

मुंबई: रॉकस्टार रणबीर कपूरचा आज 39 वा वाढदिवस आहे.  रणबीरला यानिमित्ताने अनेक कलाकार वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. दरम्यान अभिनेता अर्जुन कपूरने आपल्या इन्स्टाग्रामवर एक थ्रोबॅक फोटो शेअर करत खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. अर्जुनने चक्क आलियालाच आपला आणि रणबीरचा एखादा चांगला फोटो क्लिक करण्याची मागणी केली.

रणबीर कपूरला बॉलिवूडमधील चॉकलेट बॉय म्हणून ओळखलं जातं. कपूर कुटुंबातील या अभिनेत्याने तरुणींना भुरळ घातली आहे. रणबीरचा क्युट आणि रोमँटिक अंदाज पाहून अनेक तरुणी त्याच्यावर फिदा होतात. रणबीरने ‘सावरिया’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. यामध्ये अभिनेत्री सोनम कपूर त्याची सहकलाकार होती. रणबीरने ‘रॉकस्टार, बर्फी, ये जवानी है दिवानीसारख्या अनेक चित्रपटांमधून आपलं अभिनय कौशल्य दाखवून दिल आहे. अभिनेता आजआपला ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने अनेक कलाकार रणबीरला सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

सध्या सर्वांनाच माहिती आहे, रणबीर कपूर आलिया भट्टसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. हे दोघे सतत एकत्र दिसून येतात. तसेच सुट्टीचा आनंदही घेत असतात. इतकंच नव्हे तर आलिया आणि रणबीर एकमेकांच्या प्रत्येक फॅमिली फंक्शनमध्ये उपस्थित असतात. तसेच रणबीरच्या वाढदिवसाच्या आधीच आलिया आणि रणबीर जोधपूरला गेलेलं समोर आलं आहे. त्याचबरोबर हे दोघेही लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!