नगरमध्ये दोन दिवसात दोन राजकीय नेत्यांवर जीवघेणा हल्ला

10

अहमदनगर: अहमदनगर जिल्हात मागील काही दिवसापासून राजकीय नेत्यांवर हल्ल्याच्या घटना होत आहेत. जिल्ह्यात दोन दिवसांत दोन राजकीय नेत्यांवर हल्ला झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. संगमनेरमध्ये भाजप नेत्याची चार वाहने पेटवून देण्याची घटना उलटून दोन दिवस होत नाहीत, लगेच अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे माजी संचालक व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे यांच्यावर घारगाव (ता. श्रीगोंदे) येथे जीवघेणा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात पानसरे यांच्यासह दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर अहमदनगर येथे उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  घारगाव येथे रस्त्याच्या वादातून पानसरे व परदेशी या दोन्ही कुटुंबात वाद सुरू होते. या वादाचे रुपांतर रविवारी हाणामारीत झाले. यात परदेशी कुटुंबाने रिवाल्वर, तलवार, कोयता, लोखंडी गज, दगड, मिरचीपूड या हत्यारांचा वापर करून आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप दत्तात्रय पानसरे यांनी फिर्यादीत केला आहे.

दरम्यान या हाणामारीत त्यांच्यासोबत महेश पानसरे हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी रमेश परदेशी, शिवाजी परदेशी, नारायण परदेशी, शुभम परदेशी, योगेश परदेशी, नामदेव परदेशी, विठ्ठल परदेशी, भगवान परदेशी, हरी परदेशी, जनाबाई परदेशी, वंदना परदेशी, लता परदेशी, गीता परदेशी, साधना परदेशी, परदेशी परदेशी, श्रेया परदेशी, सर्व राहणार घारगाव ( ता.श्रीगोंदे ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.