यवतमाळमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेली एसटी बस, मदतीसाठी धडपड सुरू

28

यवतमाळ: गुलाब वादळामुळे महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असून अनेक ठिकाणी पुराची परिस्थिती उद्भवली आहे. यातच यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड येथून 2 किमी अंतरावर असलेल्या दाहगाव नाल्याला आलेल्या पुरात बस वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ज्यामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याचं समजतं आहे. आज (28 सप्टेंबर) सकाळी 8 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथून नांदेड-नागपूर ही बस जात होती. दहागाव येथे पुलावरुन प्रचंड वेगानं पाणी वाहत असताना चालकानं पुराच्या पाण्यात बस घातली. चालकाच्या या निष्काळजीपणामुळे एका व्यक्तीचा जीव गेल्याची माहिती आहे. एका व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. पुलावरून पाणी जात असताना चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला. गावकऱ्यांच्या मदतीने बस मधील प्रवासी बाहेर काढणे सुरू आहे. आमदार ससाणे देखील मदत कार्याता सहभागी झाले आहेत. तर, रुग्णवाहिकेनं मृतदेह उमरखेडला पाठवण्यात आला आहे.

नांदेड-नागपूर या बसमधून 15 प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. दहागाव येथे ही बस पाण्यात वाहून गेली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. चालकाच्या निष्काळजीपणामुळे 15 प्रवाशांचा जीव धोक्यात घातला.

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.