अमेरीकेत भव्य दिव्य क्रिकेट स्टेडियम, पण स्टेडियमला दोन भारतीयांचं नाव का? जाणून घ्या?
मुंबई: मागील काही वर्षात अमेरिका हा देशही क्रिकेटमध्ये पाऊल ठेवत आहे. काही वर्षांपूर्वी दूरदूरवर अमेरिका देशाचा क्रिकेट खेळाशी काहीच संबध नव्हता. महासत्ता असलेल्या अमेरिकेला क्रिकेटमध्ये मात्र आपला झेंडा फडकवता येत नव्हता. पण आता मात्र अमेरिका देशाचा क्रिकेट संघ उदयास येत आहे. अशाच वेळी अमेरिकेत क्रिकेटचं एक भव्य क्रिकेट स्टेडियमही पाहायला मिळणार आहे. अमेरिकेतील टेक्सास स्थित एनजीओ इंडिया हाऊस ह्यूस्टननं या क्रिकेट स्टेडियमचं उदघाटन केलं.
या मैदानाची विशेष गोष्ट म्हणजे या स्टेडियमला दोन भारतीयांचं नाव देण्यात आलं आहे. तर आता तुम्ही म्हणाल अमेरिकेतील मैदानाला भारतीयाचं नाव का? तर नाव देण्यात आलेल्या डॉ. दुर्गा अग्रवाल आणि सुशीला अग्रवाल यां दोघीही भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक आहेत. डॉ. दुर्गा अग्रवाल या पिपिंग टेक्नॉलॉजी अँड प्रोडक्ट्सच्या संस्थापक आणि सीईओ आहेत. याशिवाय त्या इंडिया हाऊसच्या संस्थापक सदस्य आणि ट्रस्टी देखील आहेत. अमेरिकेत क्रिकेट या खेळाला प्रसिद्ध करण्यात या दोघींनी बराच हातभार लावला आहे. त्यामुळेच त्यांच नाव या मैदानाला देण्यात आलं आहे. या मैदानाचं उद्घाटन मागील आठवड्यात करण्यात आलं. पण कोरोनाचे संकट असल्याने मोठा समारंभ करण्यात आला नाही.
अमेरिका क्रिकेट संघ मागील काही वर्षात चांगलाच तगडा होत आहे. यामध्ये विशेष गोष्ट म्हणजे अनेक भारतीय वंशाचे किंवा भारतात आधी क्रिकेट खेळेलेल क्रिकेटपटू आहेत. यामध्ये भारताचा अंडर 19 विश्वचषक जिंकवून देणारा उन्मुक्त सिंग याचाही समावेश आहे. अमेरिका येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता यावे यासाठी भारतीय क्रिकेटमधून त्याने काही महिन्यांपूर्वीच संन्यास घेतला होता. याशिवाय मुंबईचा हरमीत सिंग हाही अमेरिकेच्या मेजर क्रिकेट लीगमधील सीएटल थंडरबोल्ट संघाकडून खेळतो.