पुणे ते सोलापूर, चार जिल्ह्यात 18 लाखांच्या 31 दुचाकी चोरी करणाऱ्या रॅकेटचा पंढरपुरात पर्दाफाश

5

पुणे: आंतरराज्यातून घेऊन बाईक चोरी करणाऱ्या टोळीला पंढरपूर पोलीसाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. चोरीला गेलेल्या 18 लाख रुपये किंमतीच्या 31 बाईक्सचा शोध लागला असून दोन अट्टल मोटारसायकल चोरांना अटक करण्यात आली आहे.

राजू उर्फ गुड्या मधुकर पवार आणि श्रीकांत मलकप्पा नडगिरे (रा. खजुरी, ता. आळंद, जि. गुलबर्गा, कर्नाटक) या दोघांवर गोपनीय माहितीच्या आधारे पाळत ठेवून त्यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यानी दिली.

यामध्ये एक लाख रुपयांच्या बुलेट पासून ते पन्नास हजार रुपये किमतीच्या मोटरसायकल दोघांनी मिळून चोरल्या होत्या. पुणे येथून 16 मोटरसायकली जप्त करण्यात आले आहेत. उर्वरित मोटरसायकल तीन जिल्ह्यात विक्री करण्यात आल्या होत्या. या सर्व 31 मोटर सायकलची किंमत 18 लाख रुपये आहेत. दोन आरोपींना पंढरपूर शहर पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली आहे.

कुठून-कुठून बाईक चोरी?

त्यानंतर पोलिसांकडून टोळीचा भांडाफोड करण्यात आला. या दोघांनी पंढरपूर, इंदापूर, माळशिरस, नातेपुते, अकलूज, यवत, कोथरुड, सांगली, खडक, बारामती अशा ठिकाणांहून दुचाकी चोरी केल्या होत्या. त्यांची विक्री करण्याचे काम सदाशिव फरतडे आणि सोमानाथ उर्फ दादा वाघमारे यांनी केले होते.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.