वर्ल्डकप 2021: भारतीय संघातून ‘या’ खेळाडूला काढले जाणार?

2

मुंबई: आयपीएलचा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर ऑलराऊंडर हार्दिक पांड्याचा फिटनेस सातत्याने चर्चेत आहे. अनफिट असल्याकारणाने पांड्याने मुंबईचे सुरूवातीचे दोन सामने खेळले नाहीत. तो सध्याच्या टप्प्यात पंजाब किंग्सविरुद्ध मैदानात उतरला. पांड्याने शानदार फलंदाजी करताना आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. त्याने ३० चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ४० धावांची खेळी केली. दरम्यान,पांड्या गोलंदाजी करताना दिसला नाही. ज्यामुळे वर्ल्डकपमधील संघातील स्थानाबाबत सवाल केले जात आहेत.

आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यानंतर लगेचच आयसीसी वर्ल्डकप २०२१ला सुरूवात होतेय. पांड्याला भारतीय १५ सदस्यीयसंघात एक ऑलराऊंडर म्हणून सामील करण्यात आले आहे. त्याच्या फलंदाजीसोबतच गोलंदाजीचीही अपेक्षा केली जात आहे. मात्र पांड्या सध्याच्या टप्प्यात गोलंदाजी करण्यास न उतरल्याने त्याच्या संपूर्णपणे फिट असण्यावर सवाल केले जात आहेत. अशातच म्हटले जात आहे की जर पांड्या पूर्ण फिटनेस मिळवू शकला नाही तर निवड समिती त्याच्या जागी शार्दूल ठाकूरच्या नावावर विचार करेल. ठाकूर वर्ल्डकपसाठी स्टँडबाय खेळाडू आहे. शार्दूलने इंग्लंडमध्ये ऑलराऊंडर कामगिरी केली होती.

मुंबईचे गोलंदाजी कोच शेन बॉन्ड यांचे म्हणणे आहे हार्दिक पांड्याला पूर्णपणे मॅच फिटनेस मिळवण्यासाठी काही वेळ पाहिजे आणि त्यासाठी मुंबईच्या दोन सामन्यांमध्ये त्याला बाहेर ठेवण्यात आले. आरसीबीविरुद्द जेव्हा पांड्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये निवडण्यात आले तेव्हा हे कन्फर्म होते की गोलंदाजी करण्याची गरज नाही. दरम्यान, संघांकडे १० ऑक्टोबरपर्यंत आपल्या टी-२० वर्ल्डकप संघात बदल करण्याचा पर्याय आहे. जर पांड्या सामन्यात चार ओव्हर टाकण्यासही असमर्थ ठरला तर बदल केले जाऊ शकतात.

Get real time updates directly on you device, subscribe now.