उपचारादरम्यान आजीचा मृत्यू, दारु पिऊन नातवाकडून पुण्यातील हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना मारहाण

1

पिंपरी चिंचवड: पुण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान महिलचा मुत्यू झाल्याने नातेवाईकाने राडा घातल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. आजीच्या मृत्यूनंतर दारु पिऊन नातवाने गोंधळ घातल्याचा आरोप केला जात आहे. डॉक्टरांना शिवीगाळ करत तरुणाने कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती. हॉस्पिटलमध्ये राडा घालणाऱ्या नातवाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील देहू रोड येथीली युनिकेअर हॉस्पिटल येथे हा प्रकार घडला आहे. नातू तुषार सुरेश चव्हाण याच्या विरोध देहू रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी तुषार चव्हाण याची आजी बेशुद्ध पडल्याने तिला बेशुद्ध अवस्थेत युनिकेअर हॉस्पिटलमध्ये आणले होते. उपचार सुरु असताना तुषारच्या आजीचा मृत्यू झाला. हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी नातेवाईकांना माहिती दिली. त्यानंतर तुषार याने दारुच्या नशेत हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला. मोठमोठ्याने आरडाओरडा करून हॉस्पिटलमध्ये उपस्थित डॉक्टर आणि स्टाफ यांना मारहाण केली. या मारहाणीची घटना रुग्णालयातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.