IPL 2021: विराटसेना सूसाट! राजस्थानवर आरसीबीचा ७ विकेट राखून विजय

16

मुंबई: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्स विरुद्धची मॅच सात विकेट राखून जिंकली. टॉस जिंकून या मॅचमध्ये गोलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या आरसीबीने राजस्थानला वीस ओव्हरमध्ये नऊ बाद १४९ या धावसंख्यवर रोखले. धावांचा पाठलाग करताना बंगळुरूने १७.१ ओव्हरमध्ये तीन विकेट गमावून १५३ धावा केल्या आणि मॅच जिंकली.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान रॉयल्सकडून एव्हिन ल्युइसने सर्वाधिक ५८ धावा केल्या. यशस्वी जयस्वालने ३१, संजू सॅमसनने १९, महिपाल लोमोरने ३, लियाम लिव्हिंगस्टोनने ६, राहुल तेवतियाने २, रियान परागने ९, ख्रिस मॉरिसने १४, चेतन सकारियाने २, कार्तिक त्यागीने नाबाद १ धावा केल्या. बंगळुरूकडून हर्षल पटेलने ३, युझवेंद्र चहल आणि शाहबाझ अहमदने प्रत्येकी २, जॉर्ज गर्टन आणि डॅनिअल ख्रिस्टिअनने प्रत्येकी एक विकेट घेतली.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून विराट कोहलीने २५ (धावचीत), देवदत्त पडिक्कलने २२, श्रीकर भारतने ४४, ग्लेन मॅक्सवेलने नाबाद ५० आणि ए बी डीविलिअर्सने नाबाद ४ धावा केल्या. राजस्थानकडून मुस्तफिजुर रहमानने दोन विकेट घेतल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.