पेट्रोल-डिझेलचे दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील रेट

मुंबई: सरकारी तेल कंपन्यांनी आज (गुरुवारी) म्हणजे 30 सप्टेंबर रोजी पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या  किंमतीत वाढ केली आहे. IOCL च्या मते, आज देशातील जवळपास सर्व शहरांमध्ये पेट्रोलच्या दरात सुमारे 25 पैसे आणि डिझेलच्या दरात 30 पैशांनी वाढ करण्यात आली आहे.

देशातील सर्वात मोठी इंधन किरकोळ विक्रेता इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOCL) च्या मते, 30 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय राजधानीत पेट्रोलची किंमत 25 पैशांनी वाढून 101.64 रुपये आणि डिझेलची किंमत 30 पैशांनी वाढून 89.87 रुपये प्रति लिटर झाली आहे. त्याच वेळी, मुंबईत पेट्रोलची किंमत 107.71 रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 97.52 रुपये प्रति लिटर.

काही राज्यातील पेट्रोलचे दर

मुंबई – 101.64 , दिल्ली – 107.71 , कोलकाता – 102.17 ,चेन्नई – 99.36 , काही राज्यातील डिझेलचे दर ,मुंबई – 89.87 , दिल्ली – 97.52, कोलकाता – 92.97, चेन्नई – 94.45

24 सप्टेंबरपासून डिझेलचे दर चार वेळा वाढले

गेल्या 4 दिवसात देशभरात डिझेलच्या किंमतीत 4 वेळा वाढ करण्यात आली आहे. भारतीय तेल कंपन्यांनी 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीत 20 पैशांनी, 26 सप्टेंबरला 25 पैसे प्रति लिटर, त्यानंतर 28 सप्टेंबरला देखील डिझेलच्या किंमतीत वाढ केली होती.

परकीय चलन दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किंमतीवर आधारित पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज अपडेट केले जातात. तेल विपणन कंपन्या दररोज किंमतींचा आढावा घेऊन पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींची माहिती अपडेट करतात.