धक्कादायक: विद्यार्थिनीवर हॉस्पिटलच्या पडीक इमारतीत सामूहिक बलात्कार

हैदराबाद: महिला सुरक्षेसाठी  कठोर कायदे करुनही महिलांविरोधात घडणारे गुन्हे कमी झालेले नाहीत. एका हॉस्पिटलच्या पडीक इमारतीत विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. तेलंगणच्या निझामाबाद जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यात सहभाग असल्यामुळे पाचही आरोपींना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

आयपीसीच्या विविध कलमांतंर्गत आरोपींविरोधात गुन्हे नोंदवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. एका वृत्त वाहिनीने वृत्त दिले आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन जणांनी मिळून सामूहिक बलात्कार केला. अन्य दोन आरोपी त्यांचे साथीदार होते. मंगळवारी रात्री विद्यार्थिनी घरी परतत असताना, लिफ्ट देण्याच्या बहाण्याने आरोपी तिला निर्जन स्थळी घेऊन गेले.

एका आरोपी बरोबर मैत्री झाल्यानंतर पीडीत मुलगी त्याच्या बाईकवर बसली. ड्राइव्हसाठी जात असल्याचे सांगून ते तिला निझामाबाद येथे घेऊन गेले. आरोपी पीडीत मुलीला एका हॉस्पिटलच्या पडक्या इमारतीत घेऊन गेले व तिच्यावर बलात्कार केला, असे पोलिसांनी सांगितले.