अभिनेत्री शिल्पा शेट्टीला ‘या’ व्हिडिओमुळे, युझर्सने चांगलचे धरले धारेवर!

मुंबई: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा आणि उद्योगपती राज कुंद्रा ला पॉर्न व्हिडिओ शूट करून ते पेड अॅपवरून शेअर केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने राजला अटक केली होती. त्यानंतर दोन महिने जेलमध्ये घालवल्यावर राजला ५० हजारांचा जामिन मंजूर करण्यात आला. राज जेव्हा तुरुंगात होता, तेव्हा शिल्पा अतिशय कठीण प्रसंगातून जात होती. त्याकाळात शिल्पा पुस्तकातील काही कोट सोशल मीडियावर शेअर करायची.

राज जेव्हा तुरुंगात होता तेव्हा शिल्पा सोशल मीडियावर सक्रीय असायची परंतु ती पोस्टमधून नवनवीन विचार शेअर करायची. राज जामिनावर बाहेर आल्यानंतर शिल्पाने बऱ्याच दिवसांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शिल्पा खूप आनंदी दिसत आहे. व्हिडिओ पाहिल्यावर सोशल मीडियावरील युझर्स विविध प्रतिक्रिया देत आहेत.

युझर्सने विचारले प्रश्न

पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राला अटक झाल्यामुळे सोशल मीडियावर तिला खूप ट्रोल करण्यात आले होते. आताही काही युझर्सनी तिला ट्रोल केले आहे. युझर्सने विचारले की ‘कुंद्राजीने विकत घेऊन दिला आहे का?’ तर आणखी एका युझरने विचारले की, ‘दोन नंबरच्या कमाईचा पैसा आहे हा’ आणखी एका युझरने थेटच लिहिले आहे की, ‘अश्लिल व्हिडिओतून कमावलेल्या पैशांतून घेतला आहे.’

जेव्हा राज कुंद्रा तुरुंगात होता तेव्हा शिल्पा डान्स रिअॅलिटी शो मध्ये सहभागी झाली होती. त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर झाले होते. शिल्पाने सुरुवातीपासूनच या प्रकरणावर थेट भाष्य करणे टाळले आहे. त्यामुळे तिला जेव्हा राज बाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ती चांगलीच भडकली. तिने प्रश्नकर्त्यालाच विचारले की, ‘मी राज कुंद्रासारखी दिसते का? मी राज कुंद्रा आहे का? नाही तुम्हीच सांगा आता मी कोण आहे?’