चेन्नईचा ६ विकेट राखून हैद्राबादवर दमदार विजय, प्लेऑफमधील स्थानही केलं पक्कं

6

मुंबई: आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील आयपीएलच्या 43 वा सामना सनरायजर्स हैद्राबाद  विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात खेळवला गेला. प्रसिद्ध अशा शारजाहच्या मैदानावर हा सामना पार पडला. शारजाहच्या छोट्याशा मैदानात मोठा स्कोर होत असतो पण या सामन्यात मात्र फार कमी धावा झाल्या. नरायझर्स हैदराबाद विरुद्धची मॅच चेन्नई सुपरकिंग्सने सहा विकेट राखून जिंकली. या विजयामुळे चेन्नई पॉइंट्स टेबलमध्ये अठरा गुणांसह अव्वलस्थानी कायम आहे.

हैदराबाद विरुद्धच्या मॅचमध्ये टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेणाऱ्या चेन्नईने हैदराबादला वीस ओव्हरमध्ये सात बाद १३४ या धावसंख्येवर थोपवले. चेन्नईने १९.४ ओव्हरमध्ये ४ विकेट गमावून १३९ धावा केल्या आणि विजय मिळवला.  चेन्नईचा बॉलर जोश हेझलवूड याने चार ओव्हरमध्ये २४ धावा देत जेसन रॉय (२ धावा), अभिषेक शर्मा (१८ धावा) आणि अब्दुल समद (१८ धावा) या तिघांना बाद केले. त्याच्या प्रभावी गोलंदाजीची दखल घेण्यात आली. त्याला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराने गौरविण्यात आले.

याआधी प्रथम फलंदाजी करताना हैदराबादकडून जेसन रॉयने २, वृद्धिमान साहाने ४४, केन विल्यमसनने ११, प्रियम गर्गने ७, अभिषेक शर्माने १८, अब्दुल समदने १८, जेसन होल्डरने ५, राशिद खानने नाबाद १७ आणि भुवनेश्वर कुमारने नाबाद २ धावा केल्या. चेन्नईकडून जोश हेझलवूडने ३, ब्राव्होने २, रविंद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी एक विकेट घेतली.

धावांचा पाठलाग करताना चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने ४५, फाफ डू प्लेसिसने ४१, मोईन अलीने १७, सुरेश रैनाने २, अंबाती रायुडूने नाबाद १७, महेंद्रसिंह धोनीने नाबाद १४ धावा केल्या. हैदराबादकडून जेसन होल्डरने ४ ओव्हरमध्ये २७ धावा देऊन ऋतुराज गायकवाड, फाफ डू प्लेसिस आणि सुरेश रैनाला बाद केले. राशिद खानने मोईन अलीला बाद केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.