राज्यात कधीही निवडणुका लागू शकता! आशिष शेलार म्हणतात……

मावळ: राज्यात तीन पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात आले आहे. परंतू जेव्हा तीन तिघाड आणि काम बिघाड सरकार काय जास्त दिवस टिकणार नाही. आघाडीतील तीन पक्षात आपसांत रोज भांडण सुरू आहेत. त्यातील दोन पक्षांचे संकेत लक्षात घेतले तर राज्यात कधीही निवडणूक लागेल, अशा दावा भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आज मावळच्या दौऱ्यावर असताना केला आहे.
यावेळी एकविरा देवीच्या पायथा मंदिरात त्यांनी देवीचे दर्शन घेतले व मावळ दौऱ्याला सुरुवात केली. त्यांच्यासोबत माजी राज्यमंत्री बाळा बेगडे आणि पदाधिकारी होते.
आगरी, कोळी बांधवांसह महाराष्ट्रातील करोडो भक्तांची अपार श्रध्दा असलेल्या आई एकविरा देवीच्या पायथा मंदिरात जाऊन दर्शन घेतले व मावळ दौऱ्याला सुरुवात केली. सोबत माजी राज्यमंत्री बाळा बेगडे आणि पदाधिकारी उपस्थित होते! pic.twitter.com/K3WnopRPBL
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 1, 2021
महाविकास आघाडी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप करताना ते म्हणालेत की, सध्या दलाल राज्य चालवत आहेत. अनेक खाती दलालांकडून चालवली जात आहेत. विविध ठिकाणी आयकर खात्याने टाकलेल्या धाडींच्या संदर्भात ते म्हणालेत की, सात दिवसांपासून आपण पाहतो आहे की आयकर विभाग काय करतो आहे.
हे तीन पक्षाचे सरकार घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज आहे. काँग्रेस ‘भुरटी’ आहे. जे मिळेल ते घेते! ते झोलबाज आहेत. शिवसेना दगाबाज आहे. मोदी आणि फडणवीसांच्या नावाने मत मागितली आणि दगाबाजी केली. दगाबाजीने का असेना, मुख्यमंत्री झालेत! दगाबाजीने सत्तेत आले तरी ते विकास करतील असे वाटले होते पण, … असा टोमणा शेलार यांनी उद्धव ठाकरेंना मारला.