लहू बालवडकर हेच सर्वसामान्य जनतेचे खरे हिरो – प्रवीण दरेकर

बाणेर प्रतिनिधी: विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर साहेब यांनी भारतीय जनता पार्टीचे युवानेते तथा समाजसेवक लहू बालवडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली

यावेळी त्यांनी लहू बालवडकर सोशल फोरम मधून सुरू असलेल्या कामाची माहिती घेतली, कोरोनाच्या काळामध्ये सर्वसामान्य माणसाला मोफत जेवण उपलब्ध करून देणे,  ॲम्बुलन्स सारख्या सुविधा स्वखर्चातून उपलब्ध करून देणे, शेतकरी ते थेट ग्राहकांपर्यंत भाजीपाला पोहोच करून देणे यासारखे अनेक उपक्रम त्यांनी बालेवाडी सुस बाणेर पाषाण भागात राबवले याबद्दल प्रवीण दरेकर यांनी त्यांचे विशेष आभार व्यक्त केले व त्यांना शुभेच्छा देखील दिल्या.

या भेटीच्या वेळेस पाटील सर यांच्या पेस अकॅडमी मधून प्रशासकीय परिक्षेत उत्तीर्ण होऊन अधिकारी बनलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार दरेकर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी प्रवीण दरेकर म्हणाले की, लहू बालवडकर यांचे कार्य खऱ्या अर्थाने खूप कौतुक पद्य आहे बालवडकर यांच्यासारखा कार्यकर्ता हे करू शकतो हे आमच्या भारतीय जनता पार्टीसाठी खूप अभिमानास्पद आहे लहू बालवडकर हेच खऱ्या  अर्थाने त्या कोरोनाच्या काळामध्ये हिरो ठरले आहेत. इथून पुढे लहू बालवडकर यांच्यासारख्या कार्यकर्त्याला पक्ष म्हणून जी ताकद पाहिजे असेल ती आम्ही देण्याचा निश्चित प्रयत्न करू असे असे सुद्धा देखील विरोधी पक्षनेते प्रवीणण दरेकर म्हणाले.