युवा बिल्डरची पुण्यात हत्या, मृतदेह विहिरीत, शिरुरमध्ये निषेधात कँडल मार्च

पुणे: पुणे जिल्हातील शिरुर शहरात दोन दिवसापूर्वी २४ वर्षीय बिल्डरचे अपहरण करु हत्या झालाचा प्रकार उडकीस आला आहे. बांधकाम व्यावसायिक आदित्य चोपडा याचे अपहरण करुन हत्यानंतर मृतदेह विहिरीत फेकून दिल्याने शिरुर परिसरात एकच खळबळ उडाली होती.

बिल्डर आदित्य चोपडा याच्या संशयास्पद मृत्यूच्या निषेधार्थ शिरुर शहरात व्यापाऱ्यांनी बंद पुकारत रात्री कँडल मार्च मोर्चा काढला होता. या हत्या प्रकरणाची तातडीने चौकशी करत आरोपींना त्वरीत अटक करावी, तसेच जलदगती न्यायालयात ही केस चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करत ‘जस्टीस फॉर आदित्य’च्या घोषणेने परिसरात एकच तणाव निर्माण झाला होता.

दुसरीकडे, विरारमधील बिल्डरच्या हत्या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली होती. जुन्या वादातून बांधकाम व्यावसायिकाची हत्या झाली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. चंद्रकांत चौहान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. निशांत कदम या बिल्डरची सप्टेंबर महिन्यात पहाटेच्या सुमारास हत्या करुन पाच जण फरार झाले होते. विरार पूर्व फुलपाडा गांधी चौकात पहाटे तीन ते साडेतीन वाजताच्या सुमारास मंदिरात जाणाऱ्या तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता.

नेमकं काय घडलं होतं?

विरार पूर्व फुलपाडा परिसरातील गांधी चौक येथे सोमवार सहा सप्टेंबरच्या पहाटे तीन ते साडेतीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती. विरारमधील 31 वर्षीय बांधकाम व्यावसायिक निशांत कदम पहाटे पापडखिंड येथील मंदिरात पूजेसाठी जात होता. यावेळी चौधरीवाडी सहकार नगर येथील एकता कम्पाउंडच्या बाजूला चिंचेच्या झाडाजवळ दबा धरून बसलेल्या अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर धारदार हत्याराने वार केले होते.

निशांत कदम याची निर्घृणपणे हत्या करुन आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले होते. विरार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेतला होता. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आल्याची माहिती विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली होती.