राष्ट्रवादीचा साताऱ्यात दोन्ही राजेंना रोखण्यासाठी मास्टर प्लॅन!

13

सातारा: खासदार उदनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले राष्ट्रवादीत असल्याने सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षाचे पॅनेल टाकले गेले नव्हते. आता दोघेही भाजपवासी झाले आहे. त्यामुळे सातारच्या दोन्ही राजांच्या विरोधात शिवसेना व काँग्रेसला सोबत घेऊन पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी खासदार शरद पवार यांच्याकडे केली.

सातारा पालिकेच्या निवडणूकीसंदर्भात आज राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार यांनी आज पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी सातारा पालिकेच्या निवडणूकीत राष्ट्रवादीचे पॅनेल टाकण्याबाबत चर्चा झाली असून महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना, काँग्रेसला सोबत घेऊन पालिकेची निवडणूक लढण्याची इच्छा दीपक पवार यांनी व्यक्त केली. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासोबत चर्चा करुन निर्णय घेऊ, असा शब्द पवारांनी दिल्याचे दीपक पवार यांनी सांगितले.

सातारा पालिकेतील नेमकी राजकिय स्थिती सांगताना दीपक पवार म्हणाले, राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सातारा पालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राजांच्या विरोधात पक्षाने पॅनेल टाकले नव्हते. तसेच पक्षाच्या चिन्हावर आजपर्यंत कधीच निवडणूक झालेली नाही. यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पालिका निवडणूकीत पॅनेल टाकावे, अशी लोक भावना आहे. लोकांची मागणी असल्याने सध्या अनेक इच्छुक उमेदवार पक्षाशी संपर्क करुन स्वतंत्र पॅनेल टाकावे, अशी मागणी करत आहेत. सातारा शहरातील अनेक इच्छुक उमेदवार राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.