लग्नाचे आमिष दाखवून पोलीस उपनिरीक्षकाने केला बलात्कार; कोथरुड पोलिसात तक्रार
पुणे: पोलीस उपनिरीक्षकाने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार झाली घटना पुणे येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी प्रवीण जरदे असे बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
आरोपी प्रविण नागेश जर्दे (रा. शांतीबन सोसायटी, कोथरुड) हा सध्या पुण्यातील वाहतूक शाखेतील येरवडा विभागात कार्यरत आहे. प्रवीण स्वतः विवाहित असताना सुद्धा 25 वर्षांच्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून गेल्या दोन वर्षापासून तो बलात्कार करत असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
तक्रारदार तरुणीशी ओळख आणि प्रेम
2019 मध्ये प्रवीण जरदे हा कोथरुड पोलिसात कार्यरत होता. पोलीस स्थानकात तक्रार देण्यासाठी आलेल्या एका तरुणीची आणि त्याची ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात होऊन तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तो दोन वर्षांपासून बलात्कार करत होता.