पुण्यात भरधाव कंटेनरची जोरदार धडक: एकाच कुंटूबातील ३ जण जाणीच ठार

पुणे: पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथे भरधाव कंटेनच्या भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील तीन जण ठार झाले आहे. यामध्ये 3 वर्षाची चिमुकली थोडक्यात बचावली ती गंभीर जखमी आहे. या अपघातात चिमुकलीच्या डोळ्यादेखत तिचे आई-वडिल व धाकट्या बहिणीने प्राण सोडले आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अशोक दगडू पवार (वय-45), सारीका अशोक पवार (वय-40) आणि अनु अशोक पवार (वय- 7 महिने) असं अपघातात मृत झालेल्यांची नावे तर शुभ्रा अशोक पवार 3 वर्षीय जखमी चिमुकलीचे नाव आहे. कंटेनर चालकास पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  मृत व्यक्ती अशोक पवार शिक्रापूर चाकण रस्त्याने आपल्या पत्नीसह दोन मुलींना घेऊन असताना एक फोन आला, यामुळे पवार यांनी रस्त्याच्या कडेला एका हॉटेलसमोर आपली दुचाकी थांबवली आणि फोनवर बोलू लागले. दरम्यान पाठीमागून आलेल्या भरधाव कंटेनरने त्यांना जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भयंकर होता की, दुचाकीसह संपूर्ण पवार कुटुंब कंटेनरखाली चिरडले गेले. सुदैवाने 3 वर्षाची चिमुकली यातून थोडक्यात बचावली.

स्थानिकांनी कंटेनर चालकास पकडले व शिक्रापूर पोलिसास अपघाताची माहिती दिली. बालाजी संजय येलगटे असं आरोपी कंटेनर चालकाचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!