‘सत्तेचा वापर विकासासाठी करणं गडकरींना जमतं’; शरद पवार म्हणतात….

6

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील महामार्गांचं लोकार्पण आणि कोनशिला समारंभ पार पडला. राष्टवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित झालेल्या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी विकासाच्या मुद्दे अधोरेखित केले. पुण्यातील कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे या कार्यक्रमाला शरद पवारांनीही हजेरी लावली. दरम्यान, या कार्यक्रमात शरद पवार यांनी गडकरींच्या कामांचे कौतुक करत गडकरींचा कार्यक्रम नवी दिशा दाखवणारा असल्याचे म्हटले आहे.

हा कार्यक्रम या जिल्ह्याच्या विकासाला दिशा देणारा कार्यक्रम आहे. मला दुसरीकडे एक कार्यक्रम होता, पण मला रोहित पवार यांच्याकडून निरोप मिळाला की, गडकरी यांनी मी यावं असं सांगितलं त्यामुळे मला येणे भाग पडले. इतर कार्यक्रमात गेलो की वर्षानुवर्षे काही बदल दिसत नाही. मात्र गडकरी यांच्या कार्यक्रमाला गेलं की दोन चार दिवसांत फरक दिसून येतो.

सगळ्या वाहतुकीत रस्त्यावरची वाहतूक समाजाच्या हिताची असते, हे काम गडकरी यांनी आपल्या हातात घेतले आहे. गडकरी यांनी ही जबाबदारी घेण्याआधी देशात ५ हजार किलोमीटर काम होता ते आता १२ हजार किलोमीटरवर गेलं आहे. मी शक्यतो रस्त्याने प्रवास करण्याचा प्रयत्न करतो. एखादा नेता देशाच्या उभारणीत कसं योगदान देतो हे गडकरी यांच्याकडे पाहून लक्षात येतं.

यावेळी बोलताना शरद पवारांनी इतर राज्यांमध्ये त्यांना येत असलेल्या अनुभवाविषयी सांगितलं. देशाच्या कोणत्याही राज्यात गेल्यानंतर त्या ठिकाणचे उत्तम रस्ते बघायला मिळतात. तिथले खासदार, मंत्री, अधिकाऱ्यांकडे हा विषय काढला की ते म्हणतात ‘ही गडकरी साहेबांची कृपा आहे’. त्यामुळे लोकप्रतिनिधी सत्तेचा अधिकार हातात आल्यानंतर त्याचा उपयोग देशाच्या उभारणीसाठी कसा करू शकतो, याचं उत्तम उदाहरण गडकरींनी दाखवलं आहे. सत्तेचा वापर विकासासाठी करणे गडकरींना जमत. कोणताही लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे गेला तर ते त्याला पक्ष न पाहता मदत करतात,असेही पवार म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.