‘गोडसे’ सिनेमा लवकरच येणार; गांधी जयंतीच्या दिवशी महेश मांजरेकरांची घोषणा

मुंबई: आज महात्मा गांधी यांची जयंती देशभरात साजरी करण्यात येते. शाळा कॉलेज, सकरारी कार्यालय यामध्ये विविध उपक्रम राबवले जातात. तसेच काँग्रेस पक्ष सामाजिक संघटना वेगळ्या कार्यक्रमातून समाज प्रबोधन करण्याच काम आज करत असतात. अशातच दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ‘गोडसे’ सिनेमा लवकरच येणार असल्याची घोषणा केली आहे.
जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं ‘बापू’ आपका नथुराम गोडसे असं एक ओळ लिहिलेलं आणि गोडसे हे नाव असलेलं सिनेमाचं पोस्टर काही वेळापूर्वीच रिलिज करण्यात आलं आहे. महात्मा गांधी यांची आज 152 वी जयंती आहे या निमित्ताने या सिनेमाची घोषणा कऱण्यात आली आहे. सुशांत सिंग प्रकरणातला संदीप सिंग आणि महेश मांजरेकर हे दोघे मिळून हा सिनेमा आणत आहेत. नथुराम गोडसेने महात्मा गांधींवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर महात्मा गांधींचा मृत्यू झाला. आता याच विषयावर सिनेमा येतो आहे.
नथुराम गोडसे हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. या व्यक्तिमत्वावर सिनेमा करायचा म्हणजे प्रचंड धैर्य हवं. मला कायमच हे वाटतं की आव्हानात्मक विषयांवर सिनेमातून भाष्य करता आलं पाहिजे. नथुराम गोडसेने महात्मा गांधींवर गोळी चालवली. नंतर त्याच्यावर खटला चालला. त्यानंतर त्याला फाशीची शिक्षा झाली अशा मोजक्याच गोष्टी लोकांना माहित आहेत. त्याच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आम्ही या सिनेमातून करणार आहोत. ही गोष्ट सांगत असताना आम्ही कुणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेऊ. तसंच सिनेमा हा आम्ही प्रेक्षकांवर सोडणार आहोत कोण चूक होतं कोण बरोबर हे प्रेक्षकांनी ठरवावं असंही महेश मांजरेकर म्हणाले.