‘बिग बॉस 15’मध्ये ‘हा’ ठरणार दमदार स्पर्धक; रातोरात फायनल झाली डील

मुंबई: छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम ‘बिग बॉस १५’ रिअॅलिटी शो आज पासून सुरू होणार आहे. या कार्यक्रमाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. दरवर्षीप्रमाणे या देखील पर्वाचे सूत्रसंचालनाची जबाबदारी सलमान खान याच्याकडेच सोपावली आहे. बिग बॉस १५ कार्यक्रमाचे प्रीमियर आजपासून प्रसारित होणार आहे. ‘बिग बॉस १५’ मध्ये १२ ते १३ स्पर्धक सहभागी होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मनोरंजन, भांडण, ड्रामा अन् बरंच काही तुम्हाला पाहायला मिळणार आहे.

आजच्या प्रीमिअरमध्ये ‘बिग बॉस 15’च्या स्पर्धकांची तोंड ओळख होईलच. पण त्यापूर्वी घरात एन्ट्री घेणाऱ्या स्पर्धकांच्या नावाचा खुलासा झाला असून, एक नाव चांगलंच चर्चेत आहे. ते नाव म्हणजे अभिनेता ” जय भानुशाली’. होय यंदाच्या सिझन मध्ये जय सुद्धा बिग बॉसच्या घरात असणार आहे.

ऐनवेळी जय भानुशालीला ‘बिग बॉस 15’चा 16 वा स्पर्धक म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे यंदाचा बिग बॉसचा सिझन प्रेक्षकांसाठी उत्तम मेजवानी असणार आहे. जय भानुशाली याआधी बिग बॉसच्या घरात गेस्ट म्हणून दिसलेला. मात्र, आता तो स्पर्धक म्हणून घरात एन्ट्री घेतोय.